Shiv Sena first woman MLA Neela Desai death news
Shiv Sena first woman MLA Neela Desai death news

ठाकरेंची मुंबईत सत्ता गेली अन् काहीवेळातच शिवसैनिकाला हार्ट अटॅक, बाळासाहेबांच्या पहिल्या महिला आमदाराचं निधन

Neela Desai passes away after heart attack in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. पक्षाच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
Published on

Shiv Sena first woman MLA Neela Desai death news : शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन झाल्याचे दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. दुःखद म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला पराभवाचा धकका बसला. मुंबईतून ठाकरेंची सत्ता गेल्यानंतर त्याच रात्री शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, नीला देसाई यांना अचानक हार्ट अॅटक आला अन् त्या धक्क्यातच त्यांचं निधन झाले.

हार्ट अटॅकने निधन

नीला देसाई यांनी शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अखेरचा श्वास घेतला. छातीत दुखू लागल्यानंतर देसाई यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. नीला देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Shiv Sena first woman MLA Neela Desai death news
Maharashtra Elections Result Live Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज्य येणार-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

कट्टर शिवसैनिक

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणी अशी नीला देसाई यांची मुंबई आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. नीला देसाई या शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील अत्यंत आक्रमक आणि कर्तबगार नेत्या होत्या होत्या. नीला देसाई यांच्या निधनाने कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shiv Sena first woman MLA Neela Desai death news
Nashik results : नाशिकमध्ये ठाकरेंना अपयश, भाजपची एकहाती सत्ता, वाचा विजयी उमेदवारांची यादी

पहिल्या महिला आमदार

१९९० च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून नीला देसाई निवडून आल्या होत्या. शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत जाणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. त्या काळात मुंबईत शिवसेनेची पाळेमुळे घट्ट करण्यात आणि महिला आघाडीला ताकद देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी त्या सतत विधानसभेत आवाज उठवला होता.

Shiv Sena first woman MLA Neela Desai death news
Thane Election Results : शिंदेंनी गड राखला, ठाकरेंना फक्त एक जागा, वाचा ठाण्यातील १३१ नगरसेवकांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com