पुण्यातील येरवडा येथे भरधाव टेम्पोचा थरारक अपघात
फुटपाथवरील नागरिकांना आणि वाहनांना टेम्पोची धडक
एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, अनेक वाहने नुकसानग्रस्त
पुण्यातील येरवडा परिसरात मोठा अपघात घडलाय. परिसरातील शहादल बाबा रोडवर भरघाव टेम्पोनं अनेक वाहनांना आणि फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. तर टेम्पोच्या धडकेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघागाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, क्र. एमएच-१२-क्यूजी-४८९४ चा टेम्पोनं शहादल बाबा रोडवर अनेक वाहनांना धडक दिली. टेम्पो चालक चॉद शेख (वय ६२) याने अमली पदार्थाचे सेवन केलं होतं आणि ते भरधाव वेगात टेम्पो चालवत होते. टेम्पो नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर ते फुटपाथवर गेले, तेथे उभी असलेली रिक्षा, दुचाकी तसेच फुटपाथवर बसलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत फुटपाथवर बसलेले सुशील निवृत्ती मोहिते (वय ४०, रा. येरवडा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात आणखी काही जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. टेम्पोच्या धडकेमुळे दुचाकी, चारचाकी वाहने आणि रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ टेम्पो चालकाला अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे. चालकाने अमली पदार्थांचे सेवन केल्यानं हा अपघात घडला. पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पनवेलवरून अक्कलकोटला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एका कारचा शनिवारी रात्री भयंकर अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये ३ पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. सर्वजण पनवेलहून एरटिका कारने (MH-46 Z 4536) अक्कलकोलटला देवदर्शनला जात होते, त्यावेळी मोहोळमधील देवडी पाटी येथे भंयकर अपघात झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.