Pune Breaking: विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, २२ बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Pune Toxic Liquor Tragedy: पुण्यामध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. २२ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
Pune Breaking: विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, २२ बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
Pune Toxic Liquor TragedySaam Tv
Published On

सचिन जाधव/ अक्षय बडवे, पुणे

विषारी दारू प्रकरणामुळे पुणे हादरले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दारूकांड प्रकरणात पुणे आणि पिंपर-चिंचवड आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ जणांचे निलंबन करण्यात आले.

हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पुणे शहर पोलिस आयुक्तांनी ३ पोलिस अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलं. हडपसर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून अशोक ईप्पर यांची नियुक्ती केली. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले संबंधित पोलिस चौकीच्या प्रभारी सहाय्यक निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हसन मुलानी यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Pune Breaking: विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, २२ बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
Pune Police: पुणे विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई, ३ पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; पोलिस दलात खळबळ

पिंपरी- चिंचवड फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात पोलिस आयुक्त यांनी दापोडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय वाघमारे तसेच तपास पथकाचे इन्चार्ज आणि ४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची पोलिस नियंत्रण कक्षात परवानगी केली. कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्त यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी जरी कारवाई केली असली तरी मृत्यूचा आकडा मोठा आहे. यामुळे अशा प्रकारच्या अवैद्य धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालत होते आणि या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा होणार हे पहावं लागणार आहे.

Pune Breaking: विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, २२ बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
Pune October Heat: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळे पुणेकर घामाघूम

दरम्यान, पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ जणांचे निलंबन करण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी पुणे विभागातील १३ जणांवर निलंबनाची कारवाई केली. यामध्ये ३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि ४ कर्मचारी यांचा समावेश आहे. पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी भागात विषारी दारू पिऊन १९ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्तव्यात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

Pune Breaking: विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, २२ बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, विषारी दारूमुळे १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com