वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Pune Teacher Arrested for Obscene Behaviour with Minor Student: महापालिकेच्या शाळेमध्ये वर्गशिक्षकाने विद्यार्थिनीसोबत वर्गातच अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Pune Teacher Arrested for Obscene Behaviour with Minor Student
Pune Teacher Arrested for Obscene Behaviour with Minor StudentSaam Tv
Published On
Summary
  • पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर.

  • चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने अश्लील कृत्य केलं.

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत वर्गशिक्षकाने अश्लील वर्तन केलं. वर्गातच शिक्षकाने कृत्य केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणानंतर पीडित मुलगी घाबरली. तिनं थेट घरी धाव घेतली. तसेच कुटुंबाला हा सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मनोज प्रभाकर धाईंजे (वय वर्ष ५१) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तर, चौथीत शिकणारी मुलगी पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत गेली होती. तेव्हा वर्गात शिक्षकही उपस्थितीत होता. शिक्षक विद्यार्थिनीच्या जवळ गेला.

Pune Teacher Arrested for Obscene Behaviour with Minor Student
पश्चिम महाराष्ट्रातील ठाकरे गटाचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

तसेच तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. संपूर्ण वर्गात विद्यार्थी असताना त्यानं पीडित मुलीसोबत हे कृत्य केलं. पीडित मुलगी घाबरली. शाळा सुटल्यानंतर तिनं थेट घर गाठलं. तसेच कुटुंबाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांना संताप अनावर झाला. त्यांनी थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठले.

Pune Teacher Arrested for Obscene Behaviour with Minor Student
सरपंचाच्या मुलाचा प्रताप! तरुणाला अमानुष मारहाण करत तोंडावर लघवी केली; आईलाही सोडलं नाही...

तसेच आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक धाईंजे याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com