पश्चिम महाराष्ट्रातील ठाकरे गटाचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

Former MLA from Sangola Joins BJP: भाजपमध्ये इनकमिंग सुरूच. ठाकरे गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडून शिवसेनेला रामराम. लवकरच भाजपमध्ये जाणार.
Former MLA from Sangola Joins BJP
Former MLA from Sangola Joins BJPSaam
Published On
Summary
  • सांगोल्यातील ठाकरे गटाचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर.

  • पालकमंत्री जयकुमार गोरे अन् साळुंखेमध्ये बैठक.

  • बैठकीनंतर चर्चेला उधाण.

येत्या काही महिन्यांत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्यात याव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक भागांत राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच सोलापुरातील सांगोल्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरूच आहे. सांगोल्यातही भाजपच्या गोटात पक्षप्रवेश सुरू आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Former MLA from Sangola Joins BJP
तारूण्यातच हाडं खिळखळी? कंबर अन् गुडघेदुखीनं त्रस्त? खा १ पदार्थ, कॅल्शियमचा सुपरडोस

गेल्या काही दिवसांपासून दीपक साळुंखे शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा होती. आज या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. माजी आमदार दीपक साळुंखे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात काल दुपारी बैठक झाली. सांगोल्यात ही बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. दरम्यान, काल त्यांनी भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Former MLA from Sangola Joins BJP
खडकवासला धरणावर उभारला जातोय भलामोठा उड्डाणपूल; २७६ खड्डे खणले, कोणत्या गावांना होणार फायदा?

दीपक साळुंखे हे २०२४च्या विधानसभेला ठाकरे सेनेचे उमेदवार होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते पक्षापासून अलिप्त होते. दरम्यान, आता दीपक साळुंखे यांचा भाजप पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली. दिवाळीनंतर साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Former MLA from Sangola Joins BJP
शिवसेना ठाकरे गटाची दिवाळी जोरात; इनकमिंग सुरूच, बड्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com