खडकवासला धरणावर उभारला जातोय भलामोठा उड्डाणपूल; २७६ खड्डे खणले, कोणत्या गावांना होणार फायदा?

New Flyover in Khadakwasla Dam Area: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपूलाच्या कामाला गती मिळाली आहे.
New Flyover in Khadakwasla Dam Area
New Flyover in Khadakwasla Dam AreaSaam
Published On
Summary
  • पुणेकरांना नवा उड्डाणपूल मिळणार.

  • खडकवासला धरणावर उभारला जातोय ८ पदरी पूल.

  • पाण्यात १२० खड्डे.

पुणे खडकवासला धरणावर एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. जो सांगरूण आणि मालखेड या गावांमधील संपर्क सुधारण्यासाठी, मुठा नदीच्या पाणलोट क्षेत्रात बांधला जात आहे. हा सुमारे ३५०मीटर लांबीचा उड्डाणपूल असून, यावर एकूण ८ पदर आहेत. हा उड्डाणपूल पाइल फाउंडेशन तंत्राद्वारे उभारला जात आहे.

या पुलासाठी एकूण २७६ खड्ड्यांची निमिर्ती करण्यात येणार आहे. त्यापैकी १५६ खड्डे जमिनीत आणि १२० खड्डे पाण्यात तयार केले जाणार आहे. आतापर्यंत पाण्यात ५९ खड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहे. स्टील, काँक्रिट आणि लाकडापासून तयार केलेल्या पाइल्सद्वारे या पुलाचे खांब उभे केले जाणार आहेत. अशी माहिती उड्डाणपूलाचे अभियंता रितेश भारद्वाज यांनी दिलीय.

New Flyover in Khadakwasla Dam Area
क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

हा उड्डाणपूल ८ पदरी असणार आहे. प्रत्येक खांबामध्ये ४० ते ६० मीटर अंतर ठेवण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात या पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. नवयुगा कंपनीकडून या पुलाचे काम जलदगतीनं सुरू आहे.

New Flyover in Khadakwasla Dam Area
कबुतरांचा उच्छाद, बाल्कनी अन् खिडक्या घाण; फक्त १ वस्तू वापरा, कबुतरं होतील गायब

रिंग रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना धरणाचं पाणलोट क्षेत्र पाहता येणार

पुणे जिल्ह्यात अशा प्रकारचा मोठा पूल कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उभारला गेला नाही. रिंग रोडसाठी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या उड्डाणपुलामुळे विरूद्ध दिशेची गावे जोडली जाणार आहे. हा द्रुतगती मार्ग असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना याचा थेट फायदा होणार नाहीय. मात्र, काही वर्षात रिंग रोडने जाणाऱ्या प्रवाशांना धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे विहंगम दृष्य पुलावरून अनुभवता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील वाहतूक सुलभतेच्या दृष्टीनं हा पूल महत्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com