कबुतरांचा उच्छाद, बाल्कनी अन् खिडक्या घाण; फक्त १ वस्तू वापरा, कबुतरं होतील गायब

Home Remedies to Keep Pigeons Away: शहरांमध्ये कबुतरांमुळे घाण पसरते. यामुळे घरातील सदस्य आजारी पडतात. जर कबुतरांच्या उच्छादामुळे त्रस्त असाल तर, एक सोपी टिप फॉलो करून पाहा.
Home Remedies to Keep Pigeons Away
Home Remedies to Keep Pigeons AwaySaam
Published On
Summary
  • शहरांमध्ये कबुतरांमुळे रोगराई पसरते.

  • पॉलिथिनचा वापर करून आपण कबुतरांना पळवून लावू शकता.

  • पाहा सोप्या टिप्स.

शहरांमध्ये कबुतरांची संख्या वाढली की, समस्याही वाढतात. बाल्कनी, खिडक्या आणि छतांवर बसून कबुतरे घाण करतात. कबुतरे एका जागेवर बसल्यानंतर विष्ठा सोडतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे रोगराई पसरते. कधी कधी कबुतरे मौल्यवान फुलांच्या कुंड्या पाडून त्यांचे नुकसान देखील करतात. कबुतरांना पळवून लावणं गरजेचं आहे. जर आपण कबुतरांपासून होणाऱ्या त्रासापासून त्रस्त असाल तर, काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा. कबुतरे पुन्हा गॅलरीजवळ फिरकणार नाही.

युट्युबर सविता शेखावत यांनी कबुतरांना पळवून लावण्यासाठी अतिशय सोपी आणि प्रभावी घरगुती उपाय शेअर केला आहे. कबुतरांना जर पळवून लावायचं असेल तर, स्वस्त आणि प्रभावी उपाय म्हणजे ब्लॅक पॉलिथिन. अर्थात काळ्या रंगाची पिशवी. काळ्या रंगाची पिशवी वापरून आपण कबुतरांना पळवून लावू शकता.

Home Remedies to Keep Pigeons Away
“ऑल इज वेल!” रेल्वे स्थानकावर महिलेला प्रसुती कळा, व्हिडिओ कॉलवर डॉक्टरची मदत घेऊन 'रँचो'नं केली डिलिव्हरी

यासाठी आपल्याला एक काळ्या पॉलिथिनची गरज आहे. दोन्ही टोकांना एक काळा धागा बांधा. ही काळी पिशवी खिडकीला बांधा. गडद रंग पाहून कबुतरे खिडकीवर किंवा बाल्कनीमध्ये पुन्हा बसणार नाही. आपण या युक्तीचा वापर करून पैशांची बचत करू शकता.

Home Remedies to Keep Pigeons Away
पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

जर, तुम्हाला वाटत असेल काळ्या पिशवीमुळे तुमच्या बाल्कनीचं सौंदर्य कमी होत असेल तर, बाल्कनीमध्ये विंडचाइम लावा. चांगला आवाज असलेला विंडचाइम घरात किंवा बाल्कनीमध्ये लावा. कबुतरांना सततचे आवाज आवडत नाही. या आवाजामुळे कबुतरे पुन्हा बाल्कनीमध्ये फिरकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com