पैशांचा वाद टोकाला; खोलीत मित्रानेच मित्राला संपवलं, पुण्यातील थरारक घटना

Pune Man Kills Close Friend: पुण्यातील कात्रजमध्ये मित्रानं केली मित्राची हत्या. पैशांच्या वादातून मित्राने मित्रालाच संपवलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Pune Man Kills Close Friend
Pune Man Kills Close FriendSaam Tv
Published On
Summary

कात्रजमध्ये मित्राने केली मित्राची हत्या.

पैसे अन् सततच्या मारहाणीला कंटाळून केला खून.

मृतदेह फेकून आरोपी फरार.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सततच्या मारहाणीला कंटाळून मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. दोन्ही मित्र एकत्र राहत होते. पैशांच्या वादातून दोघा मित्रांमध्ये वाद झाला होता. मित्राच्या सततच्या मारहाणीला कंटाळून त्यानं मित्राची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ही धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज येथील गुजर निंबाळकर वाडीतून उघडकीस आली आहे. सद्दाम उर्फ सलमान शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, विक्रम चैठा रोतीया असे मित्र आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Pune Man Kills Close Friend
लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

सद्दाम आणि विक्रम हे दोन्ही मित्र आहेत. ते दोघेही रोजंदारीवर काम करीत होते. मोलमजुरीची कामे करून दोघांचा उदरनिर्वाह सुरू होता. दोघेही एकाच खोलीत राहत होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू होते. अनेकदा उसने घेतलेल्या पैशावरून वाद व्हायचे.

सद्दाम हा विक्रमला लहान सहान गोष्टीवरून मारहाण करून त्रास द्यायचा. घटनेची दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. त्यावेळी विक्रमने सद्दामचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह खोलीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत फेकून पसार झाला होता. पोलिसांना मृतदेह सापडताच तपासाला सुरूवात केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबुली दिली असून, अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Pune Man Kills Close Friend
निवडणुकीआधी महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा निर्णय? बैठकीत नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com