लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

Family Rage Turns Deadly in Karnataka: कर्नाटकात लेकीच्या प्रेमविवाहाला पालकांचा नकार. लग्न केलं म्हणून जावईच्या आईला पेटवलं.
Family Rage Turns Deadly in Karnataka
Family Rage Turns Deadly in KarnatakaSaam
Published On
Summary
  • प्रेमविवाहावरून लेकीच्या आई वडिलांचा संताप.

  • जावयाच्या आईवर पेट्रोल शिंपडून जिवंत जाळलं.

  • या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

कर्नाटकातील चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीच्या प्रेम विवाहामुळे नाराज झालेल्या मुलीच्या पालकांनी जावयाच्या आईवर पेट्रोल ओतून जिवंत जाळून टाकले. गंभीर जखमी महिलेल्या तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी तक्रारीनुसार, पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील पाटपाल्या पोलीस स्टेशन हद्दीतील संगतापल्ली गावातील रहिवासी अंबरीश आणि सिंगप्पागारीपल्ली गावातील रहिवासी प्रतिभा हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिभाच्या घरच्या मंडळींनी या लग्नाला विरोध दर्शवला. कुटुंबियांनी केलेल्या कडाडून विरोधाला झुगारून दोघांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं.

Family Rage Turns Deadly in Karnataka
RSS सदस्यांकडून लैंगिक छळ अन् काठीनं मारहाण, इंजिनिअरनं लॉजवर उचललं टोकाचं पाऊल, १५ पानांवर संघावर आरोप

प्रतिभाच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या पळून जाण्याची बातमी कळताच त्यांचा राग शिगेला पोहोचला. मुलीचे कुटुंब अंबरिशच्या घरी गेले. मुलीच्या कुटुंबियांनी अंबरिशच्या घरी मोठा गोंधळ घातला. त्यांनी संतापाच्या भरात प्रतिभाचे पुस्तक, कपडे आणि इतर काही वस्तू जाळल्या. त्यावर पेट्रोल ओतून आग लावली. यादरम्यान, हे सर्व सुरू असताना अंबरिशची आई बयम्मा तेथून निघून गेली.

Family Rage Turns Deadly in Karnataka
फक्त ४१६ रूपयांत व्हाल करोडपती; पोस्टाची भन्नाट योजना कोणती? जाणून घ्या सविस्तर

अंबरिशची आई निघून गेल्यानंतर प्रतिभाच्या कुटुंबाला राग अनावर झाला. प्रतिभाच्या आई वडिलांनी मिळून बयम्मावर पेट्रोल शिंपडले. तसेच आग लावली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर बंगळूरूतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पाटपाल्या पोलीस स्टेशनमध्ये प्रतिभाच्या आई वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com