
तिरूवनंतपुरमच्या लॉजमध्ये तरूणानं आयुष्य संपवलं.
RSS संघावर गंभीर आरोप.
इन्स्टाग्रामवर पोस्टवर सांगितलं कारण.
तिरूवनंतपुरमच्या थंपानूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणानं लॉजमध्ये आत्महत्या केली आहे. हा तरूण कोट्टायम जिल्ह्यातील थंपलाकड या भागातील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हा तरूण मानसिक तणावाखाली जगत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांकडून झालेल्या लैंगिक छळाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली असल्याची माहिती लोकल मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.
स्थानिक रिपोर्ट्स आणि द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना गुरूवारी उघडकीस आली. आंनदू अजी असं सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाचं नाव आहे. आनंदूचे शरीर लॉजमध्ये लटकलेल्या अवस्थेत होते. बराच उशीर आनंदू खोलीबाहेर पडला नसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला. नंतर आनंदूने खोलीतच आयुष्य संपवले असल्याचे समोर आले. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती लॉज मालकाला दिली.
आत्महत्या करण्यापूर्वी आनंदूने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेड्यूल केली होती. जी त्याच्या मृत्यूनंतर पोस्ट झाली. या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं की, दीर्घकाळ सतत डिप्रेशनसारख्या मानसिक आजारांशी लढा दिल्यानंतर आता जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या मानसिक आजाराचे मुख्य कारण म्हणजे, बालपणी झालेला लैंगिक छळ.
'मी आत्महत्या करीत आहे. आत्महत्या करण्यामागे कोणतीही मुलगी, लव्हस्टोरी किंवा कर्ज, हे कारण नाही. मानसिक तणाव आणि डिप्रेशनमुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. औषधांमुळे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही', असं तरूणानं पोस्टमध्ये म्हटलंय.
आनंदू लहानपणीच RSS संघात सामील झाला होता. या संस्थेमुळे मानसिक त्रास झाला असल्याचा आरोप त्याने केला आहे. बालपणी सतत लैंगिक आणि शारीरिक छळामुळे हा मानसिक त्रास उद्भवला असल्याचं त्यानं सांगितलं. आनंदू म्हणतो, 'फक्त एक व्यक्ती आणि एक संस्था सोडून मी बाकी कुणावरही चिडलेलो नाही. आणि ती संस्था म्हणजे RSS. माझ्या वडिलांनी या संस्थेत सामील होण्यास सांगितले होते. त्याठिकाणी मी आयुष्यभर त्रास सहन केला', असं आनंदूने स्पष्ट केलं.
RSSच्या शिबिरांमध्ये शारीरिक आणि लैंगिक छळ झाला असल्याचा खळबळजनक आरोप आनंदूने केला आहे. 'RSSच्या शिबिरांमध्ये मला लैंगिक छळ सहन करावा लागला. त्या व्यक्तीचे मला नाव आठवत नाही. पण त्यांनी माझा शिबिरांमध्ये लैंगिक छळ केला आहे. त्यांनी माझ्यावर कायम काठीनं वार केले आहे',असा आरोप आनंदू केलाय.
'RSSसदस्यांशी कधीही मैत्री करू नका. नातेवाईक, वडील, भाऊ किंवा मित्र, हे लोक RSS संघात असतील तर, त्यांना आपल्या आयुष्यातून काढून टाका. हे लोत प्रचंड विषारी आहेत', असंही आनंदू म्हणाला.
RSS शिबिरांमध्ये अनेक मुलांनी असे अनुभव घेतले आहेत, असं त्यानं सांगितलं. 'हे मी फक्त माझ्याबद्दल सांगितलं आहे. RSS शिबिरांमध्ये अनेक मुलांवर शारीरिक आणि लैंगिक छळ झाला आहे. हे मी आता उघडपणे सांगू शकतो, कारण आता मी संघातून बाहेर आलोय', असं त्यानं १५ पानांच्या पत्रात लिहिलं. दरम्यान, सत्ताधारी नेत्यांनी या पोस्टची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
DYFI केरळ स्टेट कमिटीचे उपाध्यक्ष व्हि. के सनोज यांनी सांगितले की, 'या घटनेमुळे RSSचे अमानवी रूप समोर आले आहे. आनंदूच्या शेवटच्या शब्दांमुळे RSSची विचारसरणी आणि कृती किती धोकादायक आहे. हे उघड झालंय. समाजाने हे पूर्णपणे नाकारले पाहिजे', असं सनोज यांनी नमूद केलं. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.