निवडणुकीआधी महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा निर्णय? बैठकीत नेमकं काय घडलं?

Mumbai Congress Fears Losing Minority Vote Bank: मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वेगाने वारे वाहू लागले आहेत. कुणी युती, तर कुणी स्वबळाचा नारा दिला आहे. अशातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात असल्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला झाला, मात्र, आपल्याला फायदा होत नसल्याचं मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

अल्पसंख्याक मतदार काँग्रेसकडून दूर जात असल्याचं काँग्रेसच्या सर्व नेत्यांचं मत आहे. मतांचं अधिक फायदा शिवसेना ठाकरे गटाला होत असल्याचं निरिक्षण काँग्रेस नेत्यांनी बैठकीत मांडलं. मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेत्यांमध्ये याच मुद्द्यावर महत्वाची चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com