पुणे शिक्षक मतदारसंघाचा विजयाचा कोटा ठरला; सानप, गावडे की आसगावकर, सध्या कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत कौस्तुभ गावडे पहिल्या, तर सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर पिछाडीवर आहेत.
Pune Politics:
Pune PoliticsSaam Tv
Published On: 

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत अत्यंत रंजक घडामोडी समोर येत आहेत. शिक्षक मतदारसंघात बाद मतांचा आकडा आणि विजयाचा निश्चित कोटा स्पष्ट झाला आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठे उलटफेराचे संकेत मिळत आहेत. पदवीधरमध्ये विद्यमान आमदार आसगावकर थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तर शिक्षक मतदार संघात देशमुख आणि जाधव यांच्या काटें की टक्कर पाहायला मिळत आहे.

शिक्षकांचा कोटा निश्चित; दुसऱ्या पसंतीच्या मतांची लागणार गरज!

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या छाननीअंती एकूण १ हजार ६७५ मते अवैध (बाद) ठरली आहेत, तर ५१ हजार ५११ मते वैध ठरली आहेत. नियमानुसार, वैध मतांच्या आधारे जिंकून येणाऱ्या उमेदवारासाठी २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

Pune Politics:
मतमोजणीत हायव्होल्टेज ड्रामा! नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची टक्कर, तर अमरावतीत शिक्षकांचा संताप, पुण्यात काय स्थिती?

पहिल्या पसंतीची मते विभाजित झाल्याने थेट कोटा पूर्ण करणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीचा अंतिम निकाल ठरवण्यासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची (Second Preference Votes) मोजणी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.विद्यमान आमदार जयंत आसगावकर थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

शिक्षक मतदारसंघातील प्राथमिक कल (क्रमांकानुसार):

१. कौस्तुभ गावडे (भाजप/महायुती): पहिल्या क्रमांकावर आघाडीवर

२. प्रा. सचिन सानप (अपक्ष - शिवसेना शिंदे गट पाठिंबा): जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर

३. दत्तात्रय सावंत (अपक्ष): तिसऱ्या क्रमांकावर घसरले

४. जयंत आसगावकर (काँग्रेस/विद्यमान आमदार): मोठा धक्का बसून थेट चौथ्या क्रमांकावर पिछाडीवर

Pune Politics:
पुणे पदवीधरमध्ये पहिल्या पसंतीत हर्षदा देशमुख आघाडीवर, शिक्षक मतदारसंघात काय स्थिती? पाहा लेटेस्ट अपडेट

पुणे पदवीधर: हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात 'काटे की टक्कर'

दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव-देशमुख आणि महायुतीच्या (भाजप) डॉ. स्मिता जाधव यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरू आहे. प्राथमिक कलांनुसार दोघींमध्ये किंचित मतांचे अंतर असून काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पदवीधर मतदारसंघातील वैध मतांची अधिकृत छाननी पूर्ण झाल्यानंतर तेथील विजयाचा कोटा स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com