पुणे पदवीधरमध्ये पहिल्या पसंतीत हर्षदा देशमुख आघाडीवर, शिक्षक मतदारसंघात काय स्थिती? पाहा लेटेस्ट अपडेट

Pune Teachers Graduate Constituency : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल समोर आले आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये हर्षदा देशमुख आघाडीवर असल्याची माहिती आहे.
Pune Election:
Pune Graduate and Teachers Constituenc Election resultSaam tv
Published On: 

Maharashtra MLC Election Counting 2026: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली (पोस्टल) मतांनंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. मात्र, सुरुवातीच्या कलांनुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कोणाचे पारडे जड आहे, याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. नागपूरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे हेदेखील आघाडीवर आहेत. तर, अमरावतीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक १५०० मतांनी पुढे असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ

पुणे पदवीधर या मतदारसंघात मविआच्या उमेदवार हर्षदा जाधव-देशमुख आणि भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या मतात हर्षदा जाधव-देशमुख यांनी किंचित आघाडी घेतली असून, प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात होत आहे.

पुणे शिक्षक या मतदारसंघात भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर आहेत. मात्र, विद्यमान आमदार जयंत आजगावकर मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. विशेष म्हणजे, दुसऱ्या स्थानासाठी अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप यांच्यात काटे की टक्कर सुरू असून, लवकरच विजयाचा कोटा स्पष्ट होणार आहे.

Pune Election:
मतमोजणीत हायव्होल्टेज ड्रामा! नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची टक्कर, तर अमरावतीत शिक्षकांचा संताप, पुण्यात काय स्थिती?

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा पदवीधर मतदारसंघ)

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत केली आहे. एकूण ४९४ वैध मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण यांना १३७ मते मिळाली आहेत, तर डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर असून त्यांना १०० मते मिळाली आहेत.

याशिवाय, ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांना ३१ मते आणि रविराज साबळे यांना १९ पोस्टल मते मिळाली आहेत. टपाली मतदानाच्या आधारे सतीश चव्हाण सध्या ३७ मतांनी आघाडीवर आहेत.

Pune Election:
भाजपला जोरदार धक्का! माजी खासदार विरोधकांच्या पक्षात दाखल; मुलगी अन् शेकडो कार्यकर्त्यांसह सोडलं 'कमळ'

मतपत्रिकेत आढळल्या मागण्यांच्या चिठ्ठ्या

मतमोजणीदरम्यान एक रंजक आणि लक्षवेधी बाब समोर आली आहे. पदवीधर मतदार असतानाही अनेकांनी चुकीचे मतदान केल्यामुळे बाद (अवैध) मतांची संख्या बऱ्यापैकी अधिक असल्याचे दिसत आहे. याहूनही विशेष म्हणजे, अनेक मतदारांनी मतपत्रिकेतच आपल्या मागण्या लिहून चिठ्ठ्या टाकल्या आहेत. यामध्ये "अंशत अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळाले पाहिजे" आणि "जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे" अशा आशयाच्या चिठ्ठ्या मतपत्रिकेत आढळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com