Pune Porsche Car Accident: मुजोरी जाईना! अल्पवयीन आरोपीनं पोलिसांच्या एकाही प्रश्नाचं दिलं नाही उत्तर

Pune Porsche car Accident : हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाची परत एकदा चौकशी केली. मात्र यावेळी अल्पवयीन आरोपीने कोणत्याच प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत.
Pune Porsche  Car Accident: मुजोरी जाईना! अल्पवयीन आरोपीनं पोलिसांच्या एकाही प्रश्नाचं दिलं नाही उत्तर

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुणे: कल्याणी नगरमधील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाचा मुजोरपणा पु्न्हा एकदा समोर आलाय. अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांनी आज पुन्हा अल्पवयीन मुलाची चौकशी केली. मात्र यावेळी अल्पवयीन मुलाने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये.

रक्ताचे नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली. त्यानंतर सकाळी पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवालला बालसुधारगृहात नेलं होतं. तेथे पोलिसांनी शिवानी अग्रवालसमोरच अल्पवयीन मुलाची चौकशी केली. मात्र त्याने मुजोरपणा दाखवत एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पोलिसांनी त्याला अपघात प्रकरणी अनेक प्रश्न विचारली, परंतु त्याने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पोलिसांनी शिवानी अग्रवाललाही प्रश्न केली परंतु तिनेही पोलीस चौकशीला सहकार्य केलं नाही.

अल्पवयीन आरोपी जोपर्यंत चौकशीला सहकार्य करत नाही तोपर्यंत या अपघाताचा तपास पुढे जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.पोलिसांनी जवळपास एक तास अल्पवयीन मुलाची चौकशी केली, परंतु कोणत्याच प्रश्नाचे उत्तर त्याने दिलं नाही. तर रक्ताचे नमुने फेरफार प्रकरणात आईला अटक केल्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. चौकशीला सहकार्य करत नसल्याने अग्रवाल यांचा पैशाचा मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आलाय. कल्याणी नगर अपघात प्रकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com