Shirur Accident News : शिरुरमध्ये मोठा अपघात, पोलीस पाटलाच्या मुलीने तरुणांना जीपखाली चिरडलं; एकाच जागीच मृत्यू

Pune Accident News : शिरुरमध्ये पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलाने सुसाट जीप चालवत दोन तरुणांना चिरडलं. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
शिरुरमध्ये मोठा अपघात, पोलीस पाटलाच्या मुलीने तरुणांना जीपखाली चिरडलं; एकाच जागीच मृत्यू
Shirur Police Patil Accident NewsSaam TV

पुणे कल्याणीनगर परिसरातील अपघाताची घटना ताजी असताना आता शिरुर तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दोन तरुणांना जीपखाली चिरडलं आहे. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिरुरमध्ये मोठा अपघात, पोलीस पाटलाच्या मुलीने तरुणांना जीपखाली चिरडलं; एकाच जागीच मृत्यू
Pune Porsche Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉक्टरांनी बदललेले 'ते' रक्ताचे नमुने कुणाचे? मोठी माहिती उघड

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अरुण मेमाणे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर अपघातात महिंद्र बांडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा ही अल्पवयीन मुलगी जीप चालवत होती, तेव्हा तिचे पोलीस पाटील वडील ड्रायव्हर सीट शेजारीच बसले होते. याप्रकरणी शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील अरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे मालवाहू पिकअप घेऊन शेतात निघाले होते. तेव्हा त्यांनी अल्पवयीन मुलीला पिकअप चालवण्यासाठी दिला. अरणगाव शेतशिवारात पिकअप आला असता, अल्पवयीन मुलीचे पिकअपवरील नियंत्रण सुटले.

त्याचवेळी पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की पिकअपने दोन्ही दुचाकीस्वारांना ४० ते ५० फूट लांब फरफटत नेलं. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सतीश विठ्ठल मेमाणे यांच्या तक्रारीवरून शिरुर पोलिसांनी पोलीस पाटील संतोष लेंडे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीविरोधात कलम 304,109, 337, 338, 279 या कलमांसह मोटार कायदा कलम 184,134 अ ,ब 4,5,181 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Edited by - Satish Daud

शिरुरमध्ये मोठा अपघात, पोलीस पाटलाच्या मुलीने तरुणांना जीपखाली चिरडलं; एकाच जागीच मृत्यू
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com