अक्षय बडवे, साम टीव्ही
Sharad Pawar vs Ajit Pawar News: अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-भाजप सरकारसोबत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी या दोन्ही गटाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, पुण्यातही राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
बुधवारी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.
पण, यात अजित पवार (Ajit Pawar) यांची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, अजित पवार गटाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या 40 हून जास्त आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे
शरद पवार गट: खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे,दीपाली धुमाळ,काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी, महेश हांडे, बाळासाहेब रायकर , शरद डबडे, कुणाल पोकळे, सुरेखा धनिष्ठे, गणेश नलावडे, किशोर कांबळे, विक्रम जाधव आदी
अजित पवार गट: आमदार सुनील टिंगरे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, महेंद्र पठारे, प्रमोद निम्हण, आनंद आलकुंटे, दत्ता धनकवडे, बाळासाहेब बोडके, विनोद आरसे, अनिस सुंडके, प्रशांत म्हस्के, शंकर केमसे, रोहिणी चिमटे, सुनीता मोरे, सदानंद शेट्टी, विकास दांगट, बाबा धुमाळ, गणेश घुले, आदींचा पाठिंबा.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.