CM eknath shinde big announcement in front shiv sena mla mp varsha bungalow maharashtra politics
CM eknath shinde big announcement in front shiv sena mla mp varsha bungalow maharashtra politicsSaam TV

Eknath Shinde News: वर्षा बंगल्यावर रंगली शिंदे गटाची खलबतं; मुख्यमंत्र्यांनी आमदारांसमोर केली मोठी घोषणा

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेनेचे आमदार तसेच खासदारांची वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक घेतली. यावेळी शिंदेंनी आपल्या आमदारांसमोर एक मोठी घोषणा केली
Published on

Maharashtra Politics Eknath Shinde News: शिंदे-भाजप सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशा उलट सूलटही चर्चा सुरू झाल्यात आहेत.

CM eknath shinde big announcement in front shiv sena mla mp varsha bungalow maharashtra politics
Maha Political Twist: राष्ट्रवादीच्या आमदारांना १०० खोक्यांची ऑफर? ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी रात्री शिवसेनेचे आमदार तसेच खासदारांची वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक घेतली. यावेळी शिंदेंनी आपल्या आमदारांसमोर एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदी मीच कायम राहणार असून २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त जागा आपल्याला लढवायच्या आहेत.

आपण ५० जागा जिंकून आणू त्यावर फोकस करा, असा कानमंत्र शिंदेंनी आमदारांना दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांचा सरकारमधील प्रवेश म्हणजे केवळ राजकीय तडजोड आहे. ही तडजोड शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरहीत आहे. त्यामुळे यापुढे घराणेशाहीच्या राजकारणाला आता स्थान मिळणार नाही.’ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना ठणकावून सांगितलं.

CM eknath shinde big announcement in front shiv sena mla mp varsha bungalow maharashtra politics
Sharad Pawar News: छगन भुजबळ यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी आखला मोठा प्लान; ८ जुलैला काय होणार?

माझ्या राजीनाम्याच्या बातम्या कोण पेरत आहेत हे देखील मला माहीत आहे. पण आपण या सगळ्याबाबत योग्य ती काळजी नक्कीच घेऊ. त्याचप्रमाणे संकटकाळात पाठिंबा देणाऱ्या सर्व ५० आमदारांना आपण निराश करणार नाही, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना (Maharashtra Politics) त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. तसेच, विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी पाच आमदारांची नियुक्ती करणार असल्याचे शिंदेंनी आमदारांना सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com