Sharad Pawar News: छगन भुजबळ यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी आखला मोठा प्लान; ८ जुलैला काय होणार?

Sharad Pawar vs Chhagan Bhujbal: शरद पवार बंडखोर छगन भुजबळ यांना धडा शिकवण्यासाठी थेट येवल्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आहे.
Sharad Pawar vs  Chhagan Bhujbal Maharashtra Politics
Sharad Pawar vs Chhagan Bhujbal Maharashtra PoliticsSaam TV
Published On

Sharad Pawar vs Chhagan Bhujbal: अजित पवार यांच्यासह ९ बड्या नेत्यांनी शिंदे-भाजप सरकारसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत.

या दोन्ही गटाकडून आपणच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला जात आहे. आज दोन्ही गटाने मुंबईत बैठक बोलावली असून कुणाच्या बैठकीत आमदारांची संख्या जास्त असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून आहे.

Sharad Pawar vs  Chhagan Bhujbal Maharashtra Politics
Eknath Shinde Calls Meeting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? तातडीने बोलावली आमदार-खासदारांची बैठक

अशातच अजित पवार यांच्या बैठकीआधी शरद पवार यांनी मोठी रणनिती आखली आहे. शरद पवार बंडखोर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना धडा शिकवण्यासाठी थेट येवल्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आहे.

येत्या ८ जुलै रोजी ही सभा पार होणार असून भुजबळांच्या बालेकिल्ल्यातूनच शरद पवार शड्डू ठोकणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय विश्वासू असलेले नाशिकच्या येवला मतदारसंघातील आमदार छगन भुजबळ यांनीच बंड केलं.

भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासह शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात सहभागी झाल्याने त्यांच्या मतदारसंघातूनच पक्ष बांधणीचा एल्गार ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पुकारला आहे.

यापूर्वी प्रत्येक वेळेस शरद पवारांनी छगन भुजबळ यांची बाजू घेत पक्षात त्यांना साथ दिली. इतकंच नाही तर, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ २ वर्ष तुरूंगात होते. त्यावेळी तुरूंगात भुजबळांची प्रकृती खालवल्याने शरद पवार यांनी थेट राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहले होते.

Sharad Pawar vs  Chhagan Bhujbal Maharashtra Politics
Maharashtra NCP Crisis: अजितदादांच्या बैठकीआधी शरद पवारांनी खेळली नवी चाल; राष्ट्रवादीचे आमदार परत येणार?

या पत्रानंतरच छगन भुजबळ यांची तुरूंगातून सुटका झाल्याचं बोललं जात. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इतका विश्वास दर्शवला तरीही भुजबळ हे पवारांना सोडून गेले. त्यामुळे आता भुजबळ यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार यांनी मोठा प्लान आखला आहे.

शरद पवार ८ जुलै रोजी भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, छगन भुजबळांचे विरोधक व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी आज सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घेतली. शिंदे व पवारांचे अतिशय जुने नाते आहे.

किंबहुना पवारांनी राज्य कापूस पणन महासंघाचे अध्यक्षपद देखील शिंदे यांच्या पत्नी उषाताई शिंदे यांना दिले होते. हे जुने नाते वृद्धिंगत करत आज शिंदे यांनी जाहीर पाठिंबा देऊन मुंबईत पवारांची भेट घेतली .यावेळी ८ तारखेला दुपारी ३ वाजता येवल्यात सभा घेण्याचे पवार साहेबांनी मान्य केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com