Eknath Shinde Calls Meeting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? तातडीने बोलावली आमदार-खासदारांची बैठक

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पक्षातील आमदार आणि खासदारांची मुंबईत तातडीने बैठक बोलावली आहे.
CM Eknath Shinde Called Mla Urgent Meeting
CM Eknath Shinde Called Mla Urgent MeetingSaam TV
Published On

CM Eknath Shinde Called MLA Urgent Meeting: राज्याच्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल याचा काहीच भरोसा नाही. दोन तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णय घेतला. अजित पवार युती सरकारमध्ये सहभागी होताच शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पक्षातील आमदार आणि खासदारांची मुंबईत तातडीने बैठक बोलावली आहे.

CM Eknath Shinde Called Mla Urgent Meeting
NCP Spokesperson Rupali Thombre: अजित पवारांकडून रुपाली ठोंबरे यांना मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीच्या 'या' पदावर केली नियुक्ती

त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने नागपुरातून (Nagpur) मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपतींना राजभवनात सोडल्यानंतर त्यांनी तातडीने मुंबईला रवाना होण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे मुंबईत दाखल झाले. आता त्यांनी आपल्या गटातील आमदार आणि खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, पक्षाची भूमिका आदी मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

CM Eknath Shinde Called Mla Urgent Meeting
Amol Kolhe News: अजित पवारांच्या शपथविधीनंतर अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; थेट खासदारकीचा राजीनामा देणार

रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवार यांची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या.

अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये आलेल्या मंत्र्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांकडील महत्त्वाची खाती हवी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याशिवाय, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती नागपुरात असतानाही मुंबईकडे तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com