Amol Kolhe News: अजित पवारांच्या शपथविधीनंतर अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; थेट खासदारकीचा राजीनामा देणार

Will Amol Kolhe Resign: आपण शरद पवार यांच्याकडे राजीनामा देणार असून माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवार साहेबांसोबतच राहावं, असं अमोल कोल्हे म्हणाले.
Amol Kolhe News
Amol Kolhe NewsSaam TV
Published On

Amol Kolhe News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा सुद्धा सांगितला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले असून मोठी फूट पडली आहे. आपल्याकडे जास्त आमदारांचे पाठबळ असल्याचं अजित पवार सांगत आहे.

Amol Kolhe News
Saamana On Samruddhi Mahamarg Accident: अपघातांचे प्रमाण समृद्धी महामार्गावर जास्त का? सामनातून संतप्त सवाल; CM शिंदेंवर केला गंभीर आरोप

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे अजित पवार यांच्यासोबत शपथविधीवेळी दिसून आले होते. मात्र, आता त्यांनी आपली भू्मिका बदलली असून आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर आताचे सर्व राजकारण पाहता आपण आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचंही ते म्हणाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी एका विचार धारेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे. यामुळे मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून आपण शरद पवार यांच्याकडे राजीनामा देणार असून माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवार साहेबांसोबतच राहावं, असं अमोल कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe News
Maharashtra Politics: अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलंय; बड्या नेत्याचा दावा, CM शिंदेंचं काय होणार?

 अजित पवार यांच्या (Ajit Pawar) शपथविधीला उपस्थिती असल्याबद्दल बोलताना कोल्हे म्हणाले, मी माझ्या कामानिमित्त अजित पवार यांना भेटायला गेलो होतो. शपथविधी आहे, म्हणून आपण तिकडे गेलो नव्हतो. मला शपथविधीची कल्पनाही नव्हती. तिथे गेल्यानंतर याबद्दल समजले आणि तिथूनच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते.

दरम्यान, मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. गेल्या चार वर्षांपासून मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधितत्व करीत असून केंद्रात या मतदारसंघातील प्रश्नांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्राच्या अनेक धोरणांवर मी विरोधी भूमिका घेतली आहे. मात्र आता अशी राजकीय परिस्थिती असताना मी कसा बदलू शकतो. असा प्रश्न मला सतावतो आहे. असेही कोल्हे म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com