9-year-old girl missing in Pune found safely : पुण्यातून बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय चिमुरीडचा अवघ्या एका तासात शोध घेण्यात आला. वानवडी पोलिसांनी काही तासांत मुलाचा शोध घेतलाय. बेपत्ता झालेल्या चिमुरडीला तिच्या आई वडिलांना सुखरूप सुपूर्द करण्यात आले. पुण्यातील वानवडी भागातून बेपत्ता झालेली चिमुरडी स्वारगेट भागात पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी भागात असणाऱ्या प्रथमा सोसायटी परिसरातून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एक नऊ वर्षाची मुलगी खेळण्यासाठी गेली मात्र संध्याकाळापर्यंत घरी न आल्याने तिच्या आई वडिलांनी पोलिसात जायचं ठरवलं. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरू केला.
संध्याकाळी ७.३० वाजता तिच्या आई वडिलांनी रामटेकडी पोलीस चौकीत धाव घेतली आणि तक्रार दिली. वानवडी पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. बेपत्ता झालेल्या मुलीची माहिती पोलिसांनी ब्रॉडकास्ट करून विविध व्हॉट्सॲप ग्रुप वर प्रसारित केली. तसेच पोलिसांनी परिसरातील सी सी टिव्ही, मंदिरे, गार्डन, खाऊची दुकाने शोधायला सुरू केले.
पुढील अवघ्या एका तासात म्हणजेच रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झालेली मुलगी स्वारगेट पोलीस स्टेशन परिसरात मिळून आल्याने तिच्याकडे विचारपूस करून सुखरूप रित्या तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.