

पुण्यातील तरुणाने पिस्तुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला पोस्ट
तरुणाकडून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न
पुणे पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला केली अटक
अक्षय बडवे, साम टीव्ही
पुणे : पुण्यातील एका तरुणाने पिस्तुलमध्ये गोळ्या भरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तरुणाने पिस्तुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांत कळताच तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पळून जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेरला.
अनधिकृत पद्धतीने देशी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने देशी पिस्तूल हातात घेऊन तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. पिस्तूलसह एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केलं. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतलं. सोनू सिंग दीपकसिंग बावरी (२२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केलं आहे. लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात बावरीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना एक व्यक्ती डेक्कन कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या एका मोकळ्या जागेत बसलेला असून त्याच्याकडे एक पिस्तूल आहे अशी माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ तिथे एक पथक रवाना करत त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांना पाहताच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी जागेवर त्याला पकडून त्याची चौकशी केली आणि झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आलं. या तरुणाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हीच पिस्तूल घेऊन एक व्हिडिओ अपलोड केला होता.या आरोपीकडे पिस्तूल कुठून आलं आणि त्याचा वापर याला कशासाठी करायचा होता, याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.