Pimpri-Chinchwad Poisoned Liquor Case: पुण्यात विषारी दारुमुळे मृत्यूचे तांडव; 'त्या' लोकांना अटक, नावे आली समोर, नेमकं काय घडलं?

Toxic Liquor Deaths In Pimpri Chinchwad Latest Update: पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police investigate the site of the toxic liquor tragedy in Pimpri-Chinchwad as anger rises over illegal alcohol trade.
Police investigate the site of the toxic liquor tragedy in Pimpri-Chinchwad as anger rises over illegal alcohol trade.saam tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात मागच्या दोन दिवसांपासून विषारी दारुमुळे सुरू झालेल्या मृत्यूचे तांडव थांबत नसल्याचे दिसून येत आहे, वाढत चाललेल्या मृत्यूच्या संख्येने महाराष्ट्र हादरून गेला आहे. लागोपाठ सुरू असलेल्या मृत्यूमुळे मोठी शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर काहीजण अजूनही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून अकस्मात मृत्यूवरून हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या आकाश जाधव, अशोक हांडे आणि परदेशी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना या तिघांना ताब्यात घेतले आहे. मृत्यूमुखी झालेल्या नातेवाईकांचाही जबाब हडपसर पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे.

Police investigate the site of the toxic liquor tragedy in Pimpri-Chinchwad as anger rises over illegal alcohol trade.
Viral Video : समुद्रकिनाऱ्यावर कार गरागरा फिरवली; थेट पाण्यात दामटवली, व्हिडिओ व्हायरल

गेल्या अनेक वर्षांपासून हे अवैध धंदे सुरू - शिवसेना शहराध्यक्ष

या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने हडपसर पोलीस स्टेशनबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. हडपसर परिसरात अवैध धंदे गेल्या अनेक वर्षांपासून चालू होते. आम्ही शिवसेनेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून निवेदन देत आहोत. या अवैध धंद्यामागे कोणाचा हात आहे, हे पोलिसांना माहिती आहे, असा आरोप शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केला आहे. तसेच विषारी दारू पिऊन जे नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.या सगळ्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे, असे ही ते म्हणाले.

Police investigate the site of the toxic liquor tragedy in Pimpri-Chinchwad as anger rises over illegal alcohol trade.
पुणे हादरले! १३ जणांचा संशयास्पद मृत्यू, हडपसर-पिंपरी चिंचवडमध्ये शोककळा, धक्कादायक कारण समोर

राष्ट्रवादीकडून दारूचा अड्डा उद्ध्वस्त

पुण्यातील हडपसर परिसरात पांढरे मळा येथे असलेला हातभट्टी दारूचा अड्डा स्थानिक नागरिकांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मिळून उद्ध्वस्त केला. या ठिकाणची दारू पिऊन पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पत्र्याचे शेड उध्वस्त करून टाकले. या ठिकाणी दारूवाशी कुठे चालू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com