सचिन कदम, दिवेआगर, साम टीव्ही
स्टंटबाजीला सध्या प्रचंड ऊत आला आहे. अनेकदा स्टंटबाजी जीवावर बेतल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. आभासी प्रसिद्धीपायी अनेकांना जीव गमवावा लागलाय. असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी फिरायला आलेले काही पर्यटक पर्यटनाचा निखळ आनंद घेण्याऐवजी आसुरी आनंद घेताना दिसत आहेत. एकानं तर आपली आलिशान कार किनाऱ्यावर गरागरा फिरवली. समुद्रात लाटा उसळत असताना कार थेट पाण्यात दामटवल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. बेदरकारपणे कार पळवत असतानाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्रकिनारी धुमाकूळ घालणाऱ्या या पर्यटकांवर स्थानिक प्रशासन आता कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.