Pune Police: पुणे शहरात पोलिसच असुरक्षित?, कार अडवल्याचा राग; थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी
Pune Traffic Police Beaten NewsSaam Tv

Pune Police: पुणे शहरात पोलिसच असुरक्षित?, कार अडवल्याचा राग; थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी

Pune Traffic Police Beaten By Youth: पुण्यामध्ये कार अडवल्याचा राग आल्याने तरुणांनी दोन पोलिसांना मारहाण करत धमकी दिली. पुण्यातील सिंहगड रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यामध्ये हिट अँड रन प्रकरणाच्या (Pune Hit And Run Case) घटना वारंवार घडत आहेत. अशामध्ये आता गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या पुणे पोलिसांनाच (Pune Police) मारहाण केली जात असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसच असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यामध्ये कार अडवल्याचा राग आल्याने तरुणांनी दोन पोलिसाला मारहाण करत धमकी दिली. पुण्यातील सिंहगड रोडवर ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Pune Police: पुणे शहरात पोलिसच असुरक्षित?, कार अडवल्याचा राग; थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी
Pune Zika Virus Update: पुणेकरांनो काळजी घ्या! झिकाच्या रुणांमध्ये होतेय झपाट्याने वाढ, रुग्णसंख्या १५ वर

मिळालेल्या माहितीनुसार, हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी -शिवनगर रस्ता याठिकाणी वाहतूक कोंडी होते. दरम्यान रविवारी वाहतूक कोंडी हटविण्यासाठी पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड आणि आर. सी. फडतरे हे त्याठिकाणी ड्युटीवर होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून ऋषिकेश गायकवाड यांनी ती कार थांबवून रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले.

Pune Police: पुणे शहरात पोलिसच असुरक्षित?, कार अडवल्याचा राग; थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी
Water Storage in Pune Dam : पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

कार अडवल्याचा कारचालक मंगेश फडके या तरुणाला राग आला. त्याने पोलिसांसोबत अरेरावी सुरू केली आणि कार बाजूला घेण्यास नकार दिला. मंगेश फडकेने कार तशीच रस्त्यामध्ये उभी केली आणि त्याने पोलिसांशी वाद घालण्या सुरूवात केली. कार रस्त्यावर उभी ठेऊन मंगेश खाली उतरला आणि त्याने 'मी कोण आहे तुला माहित नाही. तू नोकरी कशी करतो तेच बघतो.' असे म्हणत पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

Pune Police: पुणे शहरात पोलिसच असुरक्षित?, कार अडवल्याचा राग; थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी
Pune News: खासगी गाडीवर लाल दिवा भोवला; IAS अधिकारी पूजा खेडकर यांची थेट वाशिमला बदली, काय आहे प्रकरण? VIDEO

यावेळी दुसरे पोलिस अंमलदार आर. सी. फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावून आले. तेव्हा कारमध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी हा कारमधून उतरला आणि त्याने फडतरे यांना मारहाण केली. दोन्ही तरुणांनी या पोलिसांना मारहाण केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्याविरोधात हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Police: पुणे शहरात पोलिसच असुरक्षित?, कार अडवल्याचा राग; थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी
Pune Hit And Run: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना कारने उडवणारा आरोपी अखेर सापडला; पोलिसांनी काही तासांतच शोधलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com