Pune Zika Virus Update: पुणेकरांनो काळजी घ्या! झिकाच्या रुणांमध्ये होतेय झपाट्याने वाढ, रुग्णसंख्या १५ वर
Pune Zika Virus CasesSaam TV

Pune Zika Virus Update: पुणेकरांनो काळजी घ्या! झिकाच्या रुणांमध्ये होतेय झपाट्याने वाढ, रुग्णसंख्या १५ वर

Pune Zika Virus Patient Increased: झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिलांना आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पुणे महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे. पोलिकेकडून पुणेकरांची रक्त तपासणी केली जात आहे.
Published on

अक्षय बडवे, पुणे

पुणेकरांची (Punekar) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये झिका व्हायरस (Zika Virus) वेगाने पसरत आहे. पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील झिकाच्या रुग्णांची संख्या १५ वर पोहचली आहे. त्यामुळे पुणेकरांचे टेन्शन वाढले आहे. झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिलांना आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पुणे महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे. तसंच याबाबत पालिकेकडून उपाययोजना देखील केल्या जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १५ वर पोहचली आहे. झिकाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे अनेक जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. पुणे शहरात झिकाचे नव्याने तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. झिकाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालिकेचे देखील टेन्शन वाढले आहे.

Pune Zika Virus Update: पुणेकरांनो काळजी घ्या! झिकाच्या रुणांमध्ये होतेय झपाट्याने वाढ, रुग्णसंख्या १५ वर
Pune Traffic Rule: पुणेकरांनो सावधान! दारू पिऊन वाहन चालवणं पडणार महागात, लायसन्स कायमस्वरूपी होणार रद्द

महत्वाचे म्हणजे, झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गर्भवती महिला आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत झिकाचे जे रुग्ण आढळले आहेत त्यामध्ये गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. हेच लक्षात घेता पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ३१ गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचे रिपोर्ट अद्याप आला नाही.

Pune Zika Virus Update: पुणेकरांनो काळजी घ्या! झिकाच्या रुणांमध्ये होतेय झपाट्याने वाढ, रुग्णसंख्या १५ वर
Water Storage in Pune Dam : पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com