Nandurbar Accident News: हृदयद्रावक! ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत, चालक फरार

Nandurbar Latest News: नंदुरबार शहरातील करण चौफळीवर खराब रस्त्यामुळे आणखी एक अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Nandurbar Accident News: हृदयद्रावक घटना! ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत
Nandurbar Latest News:Saamtv

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. २१ जून २०२४

नंदुरबारमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नंदुरबार शहरालागत असलेल्या करण चौफुलीवर ट्रकच्या धडकेत एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

Nandurbar Accident News: हृदयद्रावक घटना! ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत
Scheme For Poor Women: लाडक्या बहिणींसाठी खटाखट योजना! शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, खात्यात येणार थेट रक्कम; VIDEO

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात जणू अपघातांचे सत्रच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सांगोल्यात एका भरधाव ट्रकने ४ महिला मजूरांना चिरडल्याची घटना घडली होती. अशीच भयंकर अपघाताची घटना नंदुरबारमध्ये घडली असून या दुर्घटनेत एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

नंदुरबार शहरालगत असलेल्या करण चौफुलीवर आज सकाळी दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. ट्रकच्या धडकेनंतर दुचाकीवरील गर्भवती महिला खाली पडली अन् अवजड माल भरलेल्या ट्रकचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले. ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कवा पाडवी असे मृत महिलेचे नाव आहे.

Nandurbar Accident News: हृदयद्रावक घटना! ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत
Nashik City Bus Service : नाशिक सिटी लिंक बस सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल; कर्मचा-यांनी पगार थकल्याने पुकारला संप

याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, करण चौफुली नजीक दररोज लहान-मोठे अपघात होत असतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Nandurbar Accident News: हृदयद्रावक घटना! ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत
Sanjay Raut Video: 'लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू', CM केजरीवाल यांच्या जामीनानंतर संजय राऊत बरसले; मोदी- शहांवर निशाणा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com