Gov Scheme for Women: लाडक्या बहिणींसाठी खटाखट योजना! शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, खात्यात येणार थेट रक्कम; VIDEO

Maharashtra Government New Scheme for Women: राज्यातील गोरगरीब, मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला थेट पैसे जमा होतील, अशा पद्धतीची योजना राज्य सरकार आखत असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणुकांआधी त्याची घोषणा करण्याचा सरकारचा मानस आहे.
Scheme For Poor Women: लाडक्या बहिणींसाठी खटाखट योजना! शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, खात्यात येणार थेट रक्कम; VIDEO
Maharashtra Government New Scheme: Saamtv
Published On

मुंबई, ता. २१ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट पाहता विधानसभेसाठी राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस पवार सरकार विधानसभा निवडणुकांआधी लोकाभिमुख योजनांच्या घोषणा करण्याच्या विचारात आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील 'लाडली बहना' योजनेसारखी राज्यातील महिलांसाठी 'खटाखट' योजना आखली जात आहे.

महिला भगिणींसाठी देशातील विविध राज्यांमध्ये अनेक चांगल्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा आणि गाजलेली योजना म्हणजे मध्यप्रदेशातील लाडली बहना योजना. शिवराजसिंह चौहान यांच्या काळात सुरू झालेली ही योजना देशभरात चर्चेत होती. या योजनेचा मोठा फायदा त्यांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्येही झाला.

याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारही राज्यातील महिला वर्गाला गुड न्यूज देणार आहे. राज्यातील गोरगरीब, मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला थेट पैसे जमा होतील, अशा पद्धतीची योजना राज्य सरकार आखत असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणुकांआधी त्याची घोषणा करण्याचा सरकारचा मानस आहे.

Scheme For Poor Women: लाडक्या बहिणींसाठी खटाखट योजना! शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, खात्यात येणार थेट रक्कम; VIDEO
Eknath Khadse Joins BJP | एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश?; अधिकृत प्रतिक्रियाही दिली, अनौपचारीक घोषणाही केली, VIDEO बघा

काय आहे मध्यप्रदेशातील लाडली बहन योजना?

दरम्यान, सध्या केंद्रात कृषीमंत्री असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री असताना लाडली बहना योजना आणली होती. या योजनेअंतर्गत गरीब, गरजू महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1250 रुपये जमा केले जातील, अशी तरतूद करण्यात आली होती. या योजनेचा मोठा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला.

Scheme For Poor Women: लाडक्या बहिणींसाठी खटाखट योजना! शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, खात्यात येणार थेट रक्कम; VIDEO
Sanjay Raut Video: 'लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू', CM केजरीवाल यांच्या जामीनानंतर संजय राऊत बरसले; मोदी- शहांवर निशाणा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com