Sanjay Raut Video: 'लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू', CM केजरीवाल यांच्या जामीनानंतर संजय राऊत बरसले; मोदी- शहांवर निशाणा!

Maharashtra Politics News: कथित मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Sanjay Raut Video:  'लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू', CM केजरीवाल यांच्या जामीनानंतर संजय राऊत बरसले; मोदी- शहांवर निशाणा!
Sanjay RautSaam Tv

मयुर राणे, मुंबई|ता. २१ जून २०२४

अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पुरावे नसतानाही त्यांना जेलमध्ये डांबून ठेवले. या देशामध्ये या देशांमध्ये लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे' असा घणाघात करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केली. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही कारण लोकांचा कौल होता. मुख्यमंत्री म्हणूनच त्यांना तुरुंगात टाकले. अरविंद केजरीवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे आणखी दोन-तीन मंत्री आहेत. ज्यांना ईडी, सीबीआयने आत टाकले. या सर्वांना केजरीवाल यांच्या सुटकेने चपराक मिळाली, असे संजय राऊत म्हणाले.

"अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा वारंवार पराभव केला त्यामुळेच काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली. जसं मला अटक केली अनिल देशमुख यांना अटक केली. या देशात काही वर्षांपासून लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे' असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

Sanjay Raut Video:  'लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू', CM केजरीवाल यांच्या जामीनानंतर संजय राऊत बरसले; मोदी- शहांवर निशाणा!
Laxman Hake Hunger Strike: लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी हालचाली; सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीत दाखल|VIDEO

"संपूर्ण घटनात्मक संस्था सरकारच्या बाहुल्यांप्रमाणे काम करत आहेत. अरविंद केजरीवाल संजय राऊत अनिल देशमुख नवाब मलिक हेमंत सोरेन मनीष सिसोदिया यांना पुराव्याशिवाय अटक केली जाते. पण आम्ही पुरावे देऊनही कारवाया होत नाहीत, याबाबत आम्ही जाब विचारणार आहोत," असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut Video:  'लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू', CM केजरीवाल यांच्या जामीनानंतर संजय राऊत बरसले; मोदी- शहांवर निशाणा!
Pune Maval Firing CCTV : पुण्यात चाललंय काय? तळेगावात हवेत 5 राऊंड फायर; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com