Buldhana Crime : शेतीच्या वादातून महिलेला मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवा शेत शिवारामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : वडिलोपार्जित शेतीचा वाद होता. या वादातून एका महिलेला एका गटाने बेदम मारहाण केली. कोयता, कुऱ्हाड हातात घेऊन सदर महिलेला मारहाण झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या मांडवा शेत शिवारात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Buldhana News
Sambhajinagar Rain : एकीकडे पावसाचा हाहाकार तर संभाजीनगर जिल्ह्यात १० दिवसापासून पावसाची दडी; पिकांनी टाकल्या माना

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवा शेत शिवारामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवारात असलेल्या वडिलोपार्जित शेतीच्या वादातून आठ जणांनी हातात कोयता, चाकू व कुऱ्हाड  घेऊन एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हातात कोयता, चाकू आणि बाचाबाची होत असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. सात ते आठ जणांनी मिळून (Crime News) मारहाण केल्याने या मारहाणीमध्ये एक महिला जखमी झाली असून तिच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Buldhana News
Nashik Water Scarcity : दमदार पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा; प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

आठ जणांवर गुन्हा दाखल 

घटनेतील जखमी महिला सुमन सोनुने यांनी याबाबत बीबी (Police) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहितेनुसार मारहाण करणाऱ्या आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास बीबी पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com