Dombivali News : डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यात खुलेआम मद्य पार्ट्या; हातगाड्यावर पोलिस आणि केडीएमसीची कारवाई

Dombivali News : बिअर शॉप बाहेरच खुलेआम दारूचे ग्लास रिचवण्याचे मद्यपीचे कारनामे सुरू आहेत. यातून अनेकदा हाणामाऱ्या, छेडछाड सारखे अनुचित प्रकार देखील घडत आहेत
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात वाइन शॉप लगतच भर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास मद्यपीची खुलेआम दारू पार्टी सुरू असते. रोज रात्री हा प्रकार सुरु असतो. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास केडीएमसी व पोलिसांच्या पथकाने स्टेशन परिसरात कारवाई केली. यावेळी स्टेशन परिसरात बेकायदेशीरपणे खाद्य पदार्थांच्या गाड्यावर कारवाई करत जप्त करण्यात आल्या आहेत. 

Dombivali News
Dhule Crime : हॉटेलमध्ये दोघांवर जीवघेणा हल्ला; एकाची प्रकृती गंभीर, संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कल्याण- डोंबिवलीमध्ये (Dombivali) महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर बार, ढाबे टपऱ्यावर कारवाई सुरू झाली आहे. मात्र शहरात काही ठिकाणी चक्क वाईन शॉप, बिअर शॉप बाहेरच खुलेआम दारूचे ग्लास रिचवण्याचे मद्यपीचे कारनामे सुरू आहेत. यातून अनेकदा हाणामाऱ्या, छेडछाड सारखे अनुचित प्रकार देखील घडत आहेत. डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन परिसरात असलेल्या वाईन शॉप बाहेर सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बहुतेक मद्यपी वाईन शॉपमधून दारू घेत समोरच कट्ट्यावर बसून खुलेआम मद्यप्राशन करत असतात. याआधी देखील अनेकदा स्टेशन परिसरातील व्हिडिओ व्हायरल झालेत. 

Dombivali News
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफे चालकांकडून लूट; जास्तीचे पैसे घेत असल्याचा आरोप

दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास (KDMC) केडीएमसीचे पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तात स्टेशन परिसरात दाखल झाले. पोलिसांनी खुलेआम दारू पिणाऱ्या मद्यपींना ताब्यात घेत (Police) पोलिसी खाक्या दाखवत पिटाळून लावले. तर स्टेशन परिसरातील खाद्य पदार्थांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. स्काय वॉक खालील खाद्य पदार्थांचे स्टोल्स, कट्टे देखील तोडण्यात आले. केडीएमसी व पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असली तरी काही दिवसांनी कारवाई थंडावताच व पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे पोलीस आणि केडीएमसीने याबाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com