पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Tourist Drowned in Nira-Deoghar Dam: पुण्यातील एका २८ वर्षीय तरुणाचा भोर येथील नीरा-देवघर धरणात बुडून मृत्यू झाला. तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
Tourist Drowned in Nira-Deoghar Dam
TRAGEDY IN PUNE: 28-YEAR-OLD MAN DROWNS IN NIRA-DEOGHAR DAM DURING VARANDHA GHAT TRIPsaam tv
Published On
Summary
  • चार तरुण वरंधा घाटात फिरण्यासाठी गेले असताना दुर्दैवी घटना घडली.

  • भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरणात पोहताना २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • तीन तासांच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा- देवघर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली. पुणे येथील चार तरुण वरंधा घाटात फिरण्यासाठी गेले होते.त्यावेळी निरा - देवघर धरणातील पाणी पाहून तरुणांना धरणात पोहण्याचा मोह झाला. ते वेणूपुरी जवळ असलेल्या धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. धरणात उतरलेल्या चार तरुणांमधील एकाला पोहता येत नसल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.देवेश राज मिश्रा वय-२८ रा. लोणी काळभोर ता.हवेली असं मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे.

Tourist Drowned in Nira-Deoghar Dam
Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं

तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर भोर येथील भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन,पोलीस कर्मचारी, स्थानिक नागरिक तसेच पोलिस पाटील यांनी बुडालेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून चार तरुण सुट्टी निमित्त वरंधा घाटात फिरण्यासाठी आले होते.

Tourist Drowned in Nira-Deoghar Dam
Crime News: म्हाडा कॉलनीत दोन गटात हाणामारी; मारामारीदरम्यान एकानं जमावावर ताणली बंदूक अन्...

धरण पाहिल्यावर तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नसल्यामुळे त्यांनी नीरा- देवघर धरणात पोहण्यासाठी वेणूपुरी गावातून नदीपात्रात गेले.परंतु देवेश मिश्रा याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.त्याला वाचविण्यासाठी त्याच्या सोबत असलेल्या तरुणांनी प्रयत्न केले परंतु त्यांना बुडालेल्या तरुणाला वाचवण्यात अपयश आले.सदर घटनेची माहिती इतर तरुणांनी ११२ नंबरवर कॉल करून कळविली असता भोर पोलीस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com