नितीन पाटणकर, प्रतिनिधी
राजकीय नेत्यांकडे विकासाची दृष्टी हवी. सत्तेत असणाऱ्यांकडे सौंदर्यदृष्टी नसल्यानेच शहरे बकाल होत आहेत. असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यामध्ये जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त मनसे अध्यक्षांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत विविध विषयांवर भाष्य केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टमध्ये झालेल्या या मुलाखतीत राज ठाकरेंनी राज्यकर्त्यांवर निशाणा साधला. "शहरे वसवण्यासाठी किंवा सौंदर्यदृष्टी असायला हवी. मात्र महापालिकेमध्ये शहर नियोजन नाही. आर्किटेकपेक्षा पालिकेत इंजिनिअरला जास्त महत्त्व आहे, असा टोला मनसे अध्यक्षांनी लगावला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोबायोग्राफी प्रकाशनावेळी घडलेला एका खास किस्साही सांगितला.
राज ठाकरेंचा किस्सा त्यांच्या शब्दात..
२००६ साली गेट वे ऑफ इंडिया समोर मा. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या फोटोबायोग्राफी प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अटलबिहारी वाजपेयींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpayee) यांच्या सिक्युरिटीमधील चिफ माझ्याकडे आला.
त्याने ताज हॉटेलकडे बोट दाखवत ये क्या है? असा प्रश्न विचारला. मी त्याला ताज हॉटेल है.. असे उत्तर दिले. यावर त्या तरुणाने अच्छा, ये तो बहोत डेंजर है, लेकिन इसको ढकना होगा, असे तो म्हणाला अन् मी संतापलो. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एक मोठी ताजमहालची बिल्डींग झाकायची कशी? आर्कीटेक्टचा उत्तम नमुना असलेले हे हॉटेल कपड्याने झाकावे. हे त्याच्या मनात आले. असा विचार मनात कसा अन् कुठून येतो? असा सवाल विचारत त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे का? असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.