Mumbai Crime News: माझ्या बॅगेत बॉम्ब आहे, विमानात तरुण ओरडत सुटला; एमर्जंसी लँडींग होताच चक्रावणारं सत्य आलं समोर

Mumbai New: आकाशात उडत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याचं समजताच प्रवाशांची धांदळ उडाली
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV
Published On

Mumbai Crime:

मुंबई विमानतळावर एका प्रवाशाने मोठा गोंधळ घातलाय. आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा या तरुणाने केला. आकाशात उडत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याचं समजताच इतर प्रवाशांची धांदळ उडाली. आपला जीव वाचवण्यासाठी सर्वजन पळापळ करू लागले. शेवटी विमान उतरल्यावर भलतंच सत्य समोर आलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Ahmednagar Crime: धक्कादायक! रात्रीच्या अंधारात ती तरुणाशी बोलत होती; काकानं पाहताच कुऱ्हाडीचा वार, पुतणीची हत्या

थ्री इडियट्स हा चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल यामध्ये पहिलाच सीन विमानातला आहे. ज्यात फरान आपल्याला बर नाही असं सागून विमानाचं एमर्जंसी लँडींग करायला सांगतो. शुक्रवारी रात्री देखील अशीच काहीशी एक घटना घडली आहे.

अकासा एअरलाइन्सचे विमान पुण्याहून दिल्लीतकडे जाणारे विमान मध्येच मुंबईला थांबवण्यात आले. या विमानात एका प्रवाशाने मोठा गोंधळ घातला. माझ्या जवळ असलेल्या बॅगेत एक बॉम्ब आहे असं तो तरुण ओरडत होता. विमान थांबवा मला खाली उतरू द्या अशी ओरड त्याने लावली होती.

बॅगेत बॉम्ब असल्याचा प्रवाशाने दावा करताच मुंबई विमानतळावर गोंधळ झाला. विमान तात्काळ उतरवण्यात आले. पुढे बीडीडीएस मार्फत त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. तपासणीत ही अफवा असल्याच स्पष्ट झालं आहे.

पुढे तपासात तरुणाच्या मित्राने सांगितले की, त्याची तब्येत ठिक नसल्याने तो अशापद्धतीने ओरडत होता. विमानातून उतरल्यावर तरुणावर योग्य तो औषधोपचार करण्यात आला. तरुणाजळ कोणताही बॉम्ब आढळलेला नाही. मात्र त्याने उडवलेल्या अफवेमुळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

Mumbai Crime News
Gadchiroli Crime News: कुटुंबात विष कालवलं! एकाच घरातील ५ जणांच्या मृत्यूचं गूढ उकललं, सूनेचं काळं कृत्य आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com