नितीन पाटणकर, प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात जागतिक आर्किटेक दिनानिमित्त, शहर नियोजन सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज प्रकट मुलाखत झाली. ज्येष्ठ लेखक, नाट्य, चित्रपट कलाकार दिपक करंजीकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत मनसे अध्यक्षांनी शहरांच्या विद्रुपीकरणावरुन राजकीय नेत्यांवर फटकेबाजी केली.
काय काय म्हणाले राज ठाकरे?
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टमध्ये झालेल्या या मुलाखतीत राज ठाकरेंनी राज्यकर्त्यांवर निशाणा साधला. "शहरे वसवण्यासाठी किंवा सौंदर्यदृष्टी असायला हवी. मात्र महापालिकेमध्ये शहर नियोजन नाही. आर्किटेकपेक्षा पालिकेत इंजिनिअरला जास्त महत्त्व आहे. आपण वेगळा विचार करतोय आणि सत्तेत बसलेत ते वेगळा विचार करत आहेत," असे राज ठाकरे म्हणाले.
पुणे बरबाद व्हायला वेळ लागनार नाही...
मुलाखतीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे शहरांमध्ये वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि वाढत्या लोकसंख्येवरुनही चिंता व्यक्त केली. "मुंबई बर्बाद व्हायला एक काळ गेला. पण पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. आता पुणे, पुणे कुठे राहिलं आहे? पाच पुणे झाले आहेत... असे ते यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"शहरे निर्माण करताना सौर्दंयदृष्टीही सत्तेत असायला हवी. राज्यकर्त्यांमध्ये असायला हवी. मात्र आर्किटेकपेक्षा इंजिनिअरला जास्त महत्त्व दिले जाते. ज्यावेळी माझ्या हातात संपूर्ण सत्ता असेल त्यावेळी महाराष्ट्राचे नियोजन मी तुमच्या (आर्किटेक्ट) हातात देईन.." असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.