Maharashtra Politics: पुण्यातील बड्या नेत्याने दिवाळीचा मुहूर्त साधला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सूचक पोस्ट

Vasant More Political Influence: ठाकरे गटाचे माजी नगरससेवक वसंत मोरे यांनी दिवाळी आणि मुलाच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर संकेत पोस्ट करून रुपेश मोरेच्या राजकीय लाँचिंगची तयारी दाखवली आहे.
Pune political veteran Vasant More shares a Diwali and birthday post hinting at his son Rupesh More’s upcoming entry into local politics amid municipal elections.
Pune political veteran Vasant More shares a Diwali and birthday post hinting at his son Rupesh More’s upcoming entry into local politics amid municipal elections.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुका येत्या जानेवारी महिन्यापर्यंत पार पडण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर नेते मंडळींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुणे महापालिकेतील डॅशिंग लोकप्रतिनिधी अशी ओळख मिळवलेले माजी नगरसेवक वसंत मोरेही तयारीला लागले आहेत. मात्र त्यासोबतच त्यांनी आपल्या लेकाचंही पॉलिटिकल लाँचिंग सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीत मुलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत वसंत मोरेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मोठे संकेत दिले आहेत.

Pune political veteran Vasant More shares a Diwali and birthday post hinting at his son Rupesh More’s upcoming entry into local politics amid municipal elections.
Mahayuti Tension: रवींद्र धंगेकरांवर कारवाई होणार, तर नवी मुंबईतील तोच नियम लागणार; नाईकांबाबत काय म्हणाले उदय सामंत?

21 ऑक्टोबर हा वसंत मोरे यांचे सुपुत्र रुपेश मोरे यांचा वाढदिवस. वसंत मोरे यांनी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक्स सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. "मी जेव्हा 2007 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालो, तेव्हा तू शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होतास. तेव्हापासून सतत 15 वर्ष माझ्या प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीतील विजयाचा गुलाल तुझ्या अंगावर पडत आला आहे.

Pune political veteran Vasant More shares a Diwali and birthday post hinting at his son Rupesh More’s upcoming entry into local politics amid municipal elections.
गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण? करूणा मुंडेंच्या दाव्यानं राजकीय वादळ उठलं

पण यावेळी निवडणुकीत तुझ्या विजयाचा गुलाल माझ्या अंगावर पडणारच, ही कात्रजचे ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथांचीच इच्छा आहे. रुपेश वसंत मोरे, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..." असं वसंत मोरे यांनी लिहिले आहे. दिवाळी आणि वाढदिवस असे दोन्ही मुहूर्त साधत त्यांनी लेक निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Pune political veteran Vasant More shares a Diwali and birthday post hinting at his son Rupesh More’s upcoming entry into local politics amid municipal elections.
Nashik News: नाशिकमध्ये खळबळ! शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकाकडून 71 वर्षीय वृद्धाचे अपहरण

वसंत मोरे यांनी सलग तीन वेळा पुणे महापालिकेत नगरसेवकपद भूषवलं आहे. विजयाची हॅट्ट्रिक साकारल्यानंतर आता चौथ्यांदाही ते आखाड्यात उतरणार की लेकाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. महापालिका निवडणुका रखडल्यामुळे नगरसेवकपदाचा कालावधी संपून तीन वर्ष उलटून गेली, तरीही मोरेंची जनतेतील लोकप्रियता पाहता त्यांना विजयाचा चौकार मारणं अवघड नाही.

Pune political veteran Vasant More shares a Diwali and birthday post hinting at his son Rupesh More’s upcoming entry into local politics amid municipal elections.
महापौराचं काय आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचाय, भाई जगतापांच्या स्वबळाच्या दाव्यावर संजय राऊत भडकले

मात्र स्वतःच्या वॉर्डमधून ते लेकाला संधी देत एका कुटुंबात एकच तिकीट असा शिरस्ता पाळू शकतात. किंबहुना नगरसेवकपद भूषवून झाल्याने ते आता त्यांचा परिघ विस्तारत आणखी मोठ्या पदाकडे वाटचाल करु शकतात.

आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वसंत मोरे यांनी नगरसेवकपद मिळवलं आहे, मात्र आता त्यांनी ठाकरे गटाचा झेंडा हाती धरला आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवत चांगली मतं मिळवली होती. आता वसंत मोरेंना मिळणारं पाठबळ त्यांच्या मुलालाही मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com