Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

Hindi Marathi Controversy : ठाकरे बंधू एकत्र आल्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत मराठी विरुद्ध हिंदी वाद पुन्हा चिघळवला. वसंत मोरे यांनी हातात बांबू घेऊन दुबेंना थेट इशारा दिला आहे. वाद अधिक गडद होण्याची चिन्हं.
Politics News
Politics News Saam Tv
Published On

महाराष्ट्रात हिंदी मराठी भाषेचा वाद उफाळलेला असताना मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर देशभरात हा वाद पेटला. मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू एकत्र आले. पण आता मात्र परराज्यातील हिंदी भाषिक नेते देखील आक्रमक झाले आहेत. या वादात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी उडी घेतली. आपल्या घरी कुत्रेही वाघ असतात असे वक्तव्य करत निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. दुबेंच्या या वक्तव्यावर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूनी एकत्र येत सरकारला हिंदी सक्ती रद्द करण्यास भाग पाडले. त्यानंतर मीरा रोड येथे एका दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने हल्ला केला. या घटनेनंतर प्रसिद्ध उद्योजक सुशील केडीया यांनी " मी मराठी शिकणार नाही काय करायचं ते बोल" असं खुलं आवाहन राज ठाकरे यांना दिल्याने त्यांच्या मुंबईतील कंपनीची तोडफोड करण्यात आली.

Politics News
Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

शनिवारी वरळी येथे झालेल्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे म्हटले. त्यानंतर आज वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या घरात कुत्रेही वाघ असतात. याशिवाय दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना दाऊत आणि मसूद अजहर सोबत केली आहे.

दुबेंच्या या वक्तव्यावर हातात बांबू घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आवाहन दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले "हा फक्त बांबू नाही याआधी देखील हातोड्याचा वापर केला आहे. मारण्याची भाषा कोणी करत असाल तर उद्धव साहेब राज साहेब यांच्याकडे जाण्याआधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावर या. मातोश्री आणि शिवतीर्थ लांबच राहिलं.

Politics News
Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे या मग आम्हाला जे करायचं आहे ते सांगतो.दुबे महाराष्ट्रात आल्यावर नक्की त्यांना भेटू. त्यांची नक्की मुलाखत घेऊ. दोन नेत्यांचं एकत्र येणं भाजप नेत्यांना झोंबत आहे. दुबे कितीवेळा महाराष्ट्रात आणि मुंबईत आले? मुंबईतून येऊन बोला मग त्यांना कळेल" असं आवाहन वसंत मोरे यांनी दुबे यांना दिलं आहे. दरम्यान दुबे यांच्या वक्तव्यानंतर राजकारणातील मराठी हिंदी भाषिक वाद आणखी चिघळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com