Nashik News: नाशिकमध्ये खळबळ! शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकाकडून 71 वर्षीय वृद्धाचे अपहरण

Senior Citizen Kidnapped And Forced To Withdraw ₹20 Lakh: नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकावर वृद्धाचे अपहरण आणि २० लाख रुपये खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FORMER SHINDE SENA CORPORATOR ACCUSED OF KIDNAPPING 71-YEAR-OLD IN NASHIK AND EXTORTING ₹20 LAKH
FORMER SHINDE SENA CORPORATOR ACCUSED OF KIDNAPPING 71-YEAR-OLD IN NASHIK AND EXTORTING ₹20 LAKHSaam Tv
Published On
Summary

शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पवन पवारवर अपहरण आणि खंडणीचा गंभीर आरोप.

71 वर्षीय वृद्धाला गाडीत डांबून बँकेत नेऊन 20 लाख रुपये काढण्यास भाग पाडले.

आरोपींनी बळजबरीने मुखत्यारपत्र तयार करून घेतल्याचा आरोपही.

अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' या घोषवाक्याचा गजर शहरातील घराघरात पोहोचल्यानंतर आता अनेक धास्तावलेले नागरिक राजकीय गुंडांच्या विरोधात तक्रार द्यायला पुढे सरसावत आहे. आरपीआयचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेने बळकवलेल्या घर हे पोलिसांनी जमीनदोस्त केल्यानंतर आता शिंदेसेनेचा माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड पवन पवार याच्या विरोधात अपहरण करून खंडणी घेतल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

FORMER SHINDE SENA CORPORATOR ACCUSED OF KIDNAPPING 71-YEAR-OLD IN NASHIK AND EXTORTING ₹20 LAKH
Crime News: दारूच्या नशेत नवऱ्याचं भयंकर कृत्य, भरदिवसा बायकोवर कोयत्याने वार, दोन्ही हात कापले नंतर...

चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने गाडीत डांबून बँकेत घेऊन जात जबरदस्तीने बँक खात्यातून 20 लाख रुपये काढण्यास भाग पाडले. ती रक्कम हडप केल्याप्रकरणी माजी नगरसेवक संशयित पवन पवार याच्यासह त्याच्या टोळीवर अंबड पोलिस ठाण्यात खंडणीसह खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FORMER SHINDE SENA CORPORATOR ACCUSED OF KIDNAPPING 71-YEAR-OLD IN NASHIK AND EXTORTING ₹20 LAKH
Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

नवीन सिडको भागात राहणारे 71 वर्षीय फिर्यादी आजोबा यांच्या घरी जाऊन एप्रिल 2023 साली कुख्यात गुंड पवन पवार आणि त्याचा भाऊ विशाल पवार, कल्पेश किर्वे यांनी धमकावले. चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काळ्या रंगाची काच असलेल्या गाडीत बळजबरीने डांबून या वृद्धाला बँकेत नेले आणि 20 लाख रुपये काढण्यास भाग पाडून ती रक्कम पवार बंधूंनी स्वतःच्या ताब्यात घेत हडपल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

FORMER SHINDE SENA CORPORATOR ACCUSED OF KIDNAPPING 71-YEAR-OLD IN NASHIK AND EXTORTING ₹20 LAKH
सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बायकोनं जाब विचारल्याने नवरा संतापला, गोळ्या झाडून संपवलं, मुलाच्या जबाबातून पितळ उघड

तसेच फिर्यादीच्या मिळकत संबंधित नोटरी आणि जनरल मुखत्यापत्र तयार करून घेत जबरदस्तीने सह्या करून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांनी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

पवारच्या घरावर पोलिसांचा छापा

पोलिसांनी सुरू केलेल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या धडक मोहिमेमध्ये पोलिसांनी पवन पवारवर गुन्हे दाखल करत घरावर छापा टाकला होता. या कारवाईमुळे अनेकांना धीर आला आणि फिर्यादी आजोबांनी अंबड पोलिस ठाण्यात जाऊन दोन वर्षापूर्वी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com