Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याने ही माहिती दिली. यामुळे मविआतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Bhai JagtapSaam tv
Published On

Summary:

  • मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत मोठी बातमी

  • बीएमसी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार

  • काँग्रेस नेते भाई जगताप यांची माहिती

  • मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र लढणार नाही, असे मोठं वक्तव्य काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केले आहे. काँग्रेस नेत्याच्या या विधानामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

भाई जगताप यांनी सांगितले की, 'आम्ही अजिबात त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार नाही. राज ठाकरे तर सोडा उद्धव ठाकरेंसोबत देखील आम्ही निवडणूक लढवणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट डंके की चोटपर सांगितली होती. आता आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्ये देखील आम्ही सर्वांनी हेच सांगितले. मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर ही गोष्ट मांडली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात नेत्यांच्या नाही. काँग्रेसला १४० वर्षे झाली आहेत. कार्यकर्ते पक्षाचे झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन फिरतात. त्यांचीही इच्छा असते आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी. ही कार्यकर्त्यांची लढाई आहे ती कार्यकर्त्यांनाच लढवू द्या. यामध्ये आम्हाला ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचे आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.'

Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

'आम्ही आमचे मत मांडले आहे. राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे आहे असे आतापर्यंत काँग्रेसने कधीच सांगितले नाही आणि कधीच सांगणार नाही. महाविकास आघाडी एकटी थोडी आहे सगळे मिळून आहेत. जेव्हा महाविकास आघाडी तयार झाली तेव्हा उद्धव ठाकरे एकटे शिवसेनेचे प्रमुख होते आणि दोन दोन शिवसेना तयार झाल्या आहेत. आता ते काय म्हणतात त्यांच्या पक्षासाठी काय पाहिजे हा निर्णय त्यांचा आहे. तो त्यांचा अधिकार आणि निर्णय आहे. काँग्रेस असा काहीच निर्णय घेणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या स्थानिक लोकांना निर्णय घेऊ द्या. मुंबईची गोष्ट बोलायची झाली तर आम्ही स्थानिक आहोत. मुंबईत काँग्रेस पक्ष एकटं लढणार आहे. ही गोष्ट आम्ही पक्षासमोर मांडली आहे.कोणी कोणासोबत लढायचे हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईमधील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबई स्वबळावर लढणार आहोत.'

Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com