Nagpur Lok Sabha Election Voting LIVE : दक्षिण मुंबईतून पुन्हा एकदा हद्दपार करणार, भाई जगताप यांचं मिलिंद देवरांना आव्हान

Lok Sabha Election 2024 Voting Updates: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये आज शुक्रवारी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५ मतदारसंघांचा समावेश आहे.
Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE
Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Saam TV

Maharashtra Lok Sabha :दक्षिण मुंबईतून पुन्हा एकदा हद्दपार करणार, भाई जगताप यांचं मिलिंद देवरांना आव्हान

काँग्रेस आमदार भाई जगताप यांचा शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांना नाव न घेता टोला

या दक्षिण मुंबईतून पुन्हा एकदा हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही

मुंबई दक्षिण मधून महायुतीकडून कडून मिलिंद देवरांना उमेदवारीची आहे शक्यता

आमच्याकडे देखील गद्दार आहेत: भाई जगताप

ऑन मोदी गॅरंटी

जिच्या सोबत सात फेरे घेतले तिची गॅरंटी घेतली नाही ते आपली गॅरंटी काय घेणार

अबकी बार भाजप तडीपारचा दिला नारा

Baramati Lok Sabha : बारामतीत मनसेचे कार्यकर्ते जोमाने काम करणार?; सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातही मनसेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बारामतीत पार पडली.

बारामतीकरांची तहान भागवणाऱ्या भाटघर धरणातून सोडण्यात आलेले पाणी केलं बंद

भाटघर धरणात केवळ 2 TMC च पाणीसाठा असल्याने भोर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

पाणी प्रश्न न सुटल्यास 42 गावचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

अनेक वेळा निवेदन देऊन ही मार्ग निघत नसल्याने जलसमाधी घेण्याचा भाटघर धरण प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सेवा संघटनेचा इशारा

Maharashtra Lok Sabha : वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या होणार सभा

पहिल्या टप्प्यातील मतदान संपलं असून आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग येताना दिसून येतात.

21 तारखेला सायंकाळी पाच वाजता वरुड येथे शरद पवार यांची जाहीर सभा असणार आहे

तेच 22 तारखेला हिंगणघाट येथे शरद पवार यांची जाहीर सभा असून त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे सुद्धा असणारा आहेत.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात 55.29 टक्के मतदान झाले आहे.

कोल्हापूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कोल्हापूर विभागीय पथक ॲक्शन मोडमध्ये

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे मोठी कारवाई

ओरोस (कुडाळ) येथे संशयित वाहनांच्या तपासणी दरम्यान 34 लाख 32 हजारांच्या गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त

दारूसह एकूण 49 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी ठाणे आणि मध्य प्रदेश मधील दोघांना केली अटक

Pune Crime : निवडणुकीच्या काळात नागरिक दहशतीखाली; खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीने कोयता नाचवत पसरवली दहशत

पुण्यातील बिबेवाडी परिसरात 40 रुपये उधार ठेवले नाहीत म्हणून गुंडांकडून कोयत्याने मारहाण.

सदर गुन्हेगार हा रेकॉर्ड वरील असून काही दिवसापूर्वी जेलमधून बाहेर आला आहे..

बिबवेवाडी पोलिसांचं या गुंडाकडे दुर्लक्ष, सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद.

शहापूर तालुक्यातील लाहे येथे कंपनी भीषण आगीत जळून खाक

शहापूर तालुक्यातील लाहे येथे असलेल्या ऐश्वर्या प्रो.लिमिटेड कंपनी भीषण आग आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. मात्र आद्यापही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या नाहीत.

Maharashtra Lok Sabha : शिवसेनेच्या कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांसाठी मोदीच्या सभा होणार, महाराष्ट्रावर विशेष लक्ष

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मोदी महाराष्ट्रात वास्तव्यास

दोन दिवसीय दौऱ्यात मोदी २९ ता लातूर व पुणे येथे सभा घेणार

तर ३० ता सातारा कोल्हापूर जागेसाठी सभा करणार

पहिल्यांदाच मोदी महाराष्ट्रात वास्तव्याला सूत्रांची माहिती

पुण्यात - सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा

सातारा - उदयन राजेसाठी घेणार सभा

लातूर सूधाकर श्रुगांरे

कोल्हापूरात - धैर्यशील माने व संजय मंडलिक

शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांसाठी मोदीच्या सभा होणार

दिंडोरीत जे पी गावित यांच्या संवाद सभेला सुरुवात

जे पी गावित दिंडोरीतून निवडणूक लढण्याची आज घोषणा करणार

संवाद सभेला दिंडोरी मतदार संघातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थितीत

माकपचा लाल बावटा सभेतून गायब, अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी

महाविकास आघाडीत जे पी गावितांकडून बंडखोरी

माजी आमदार जे पी गावित मुळे शरद पवारांचे टेन्शन वाढवणार ?

महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे तर महायुतीकडून डॉ भारती पवार यांना उमेदवारी

Maharashtra Election Live :गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वाधिक ६४.९५ टक्के मतदान, नागपूरमध्ये सर्वात कमी

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

रामटेक ५२.३८ टक्के

नागपूर ४७.९१ टक्के

भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के

गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के

आणि चंद्रपूर ५५.११ टक्के आहे.

Maharashtra Politics : मधुकरराव चव्हाण यांच्या भाजप पक्षात प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू

काँग्रेसचे नेते सुनील मधुकरराव चव्हाण यांच्या भाजप पक्षात प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू

काँग्रेसचे धाराशिव तालुका अध्यक्ष रोहित पडवळ यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी दिला पद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

सुनिल चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का

Narendra Modi Speech : ही निवडणूक विकसित भारतासाठी; नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

विकसित भारताचं स्वप्न आता दूर नाही

२५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं

मोदींनी वर्ध्याच्या सभेत म्हटले अभंग

कितीही अडचणी आल्या तरी गॅरंटी पूर्ण करणार

७० वर्षावरील व्यक्तीला मोफत उपचार

ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

Nashik Lok Sabha : बोरसे की गोडसे ? कोण लढणार हे मुख्यमंत्री ठरवतील; संजय शिरसाट

नाशिकच्या जागेचा कोणताच तीढा नव्हता मी आधीपासून हे सांगत आलोय, आधी त्यावर शिक्कामोर्तब झालंय

नाशिकची धागा शिवसेनेकडे आहे सेना लढवेल

Ajit Pawar News : अजित पवार यांनी घेतली माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांची भेट

डॉ.पद्यसिंह पाटील यांची भेट केली तब्येतीची विचारपूस

धाराशिव शहराजवळील शिंगोली येथील निवासस्थानी अजित पवार यांनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाटील कुटंबियांच्या वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील,मल्हार पाटील यांनी केला सत्कार

Phoenix Mall Fire : फिनिक्स मॉलमध्ये लागलेली आग नियंत्रणात, कोणतीही हानी नाही

फिनिक्स मॉल मधील आग आटोक्यात आली आहे

मॉल मध्ये बंद असलेल्या एका जुन्या रेस्टॉरंटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आग

अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली

कुठलीही जीवितहानी नाही

Chhagan Bhujbal Live News : शिरुरमधून लढण्यास भुजबळांचा नकार, सूत्रांची माहिती

नाशिकऐवजी शिरुरमधून भुजबळांनी राष्ट्रवादीकडून लढावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती, सूत्रांची माहिती. भुजबळांनी शिंदेंच्या या मागणीला दिला नकार

भाजपचे वरिष्ठ नेते मात्र भुजबळांनी नाशिकमधून लढावं यासाठी आग्रही होते

अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीत नाशिकची जागा शिंदे गटाला?

त्यामुळंच भुजबळांकडून माघारीची घोषणा

Maharashtra Election Live : 5 मतदारसंघांत दुपारी ३ पर्यंत इतकं मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांत दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान झाले आहे.

रामटेक ४०. १० टक्के, नागपूर ३८. ४३ टक्के, भंडारा- गोंदिया ४५ .८८ टक्के, गडचिरोली- चिमूर ५५ .७९ टक्के

आणि चंद्रपूर ४३.४८ टक्के मतदान

Chhagan Bhujbal Latest News :  छगन भुजबळ यांची निवडणूक माघारीची घोषणा, मोदी-शहांचे मानले आभार

नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याची घोषणा छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांनी कारणही सांगितलं.

जागेचा तिढा सुटला पाहिजे आणि लवकर निर्णय होऊन कामाला सुरुवात झाली पाहिजे, असं भुजबळ म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Chhagan Bhujbal Live News : छगन भुजबळ यांची मोठी घोषणा, नाशिकमधून माघार 

नाशिकचा महायुतीसमोरचा पेच अखेर सुटला आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतली आहे. ते लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, असं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

Raigad Loksabha Live : रायगडमध्ये चुरस वाढली, 'वंचित'कडून उमेदवारी अर्ज

रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात प्रमुख लढत असली तरी, वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी अर्ज भरून तिथली चुरस वाढवली आहे. वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Baramati Lok Sabha Live : सुनेत्रा पवारांची 'चाय पे चर्चा', इंदापूर दौऱ्याला सुरुवात

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथून सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात

भवानीनगर येथे चहा घेत सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांचं स्वागत

Pune Lok Sabha Live : काँग्रेसच्या तक्रारीनंतर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

काँग्रेसचा प्रभू श्रीराम द्वेष पुन्हा अधोरेखित झाला - मुरलीधर मोहोळ

काँग्रेसचं खरं रुप या तक्रारीमुळे पुणेकरांसमोर आलं

काँग्रेसने कायम प्रभू श्रीरामांना विरोध केलाय, अशा हजार तक्रारी करा

मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान

Madha Lok Sabha Live : महादेव जानकरांचे पुतणे स्वरूप जानकरांनी माढामधून भरला उमेदवारी अर्ज

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचे पुतणे स्वरुप जानकर यांनी माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. बहुजन समाज पार्टीकडून स्वरूप जानकर माढा लोकसभेसाठी निवडणूक लढणार आहेत. चुलत्यांनी स्वीकारलं नाही म्हणून आजोबांच्या पक्षाकडून निवडणूक लढत असल्याची भावना यावेळी स्वरुप जानकर यांनी व्यक्त केलीये.

महाराष्ट्रातील ५ मतदारसंघांत दुपारी १ वाजेपर्यंत झालं इतकं मतदान!

नागपूर -

- भंडारा-गोंदियामध्ये 34.56 टक्के मतदान.

- चंद्रपूरमध्ये 30.96 टक्के मतदान.

- गडचिरोली-चिमूरमध्ये 41.01 टक्के मतदान.

- नागपूरमध्ये 28.75 टक्के मतदान.

- रामटेकमध्ये 28.73 टक्के मतदान.

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीला पाठिंबा

पुणे

लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीला पाठिंबा

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची माहिती

प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड स्वतः महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा करणार प्रचार

संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि नेते प्रचारात दिसणार

नाशिक लोकसभेसाठी आज उमेदवारी जाहीर होणार?

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराची आज घोषणा होणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दुपारी ३ वाजता बोलावली पत्रकार परिषद

नाशिकची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही

नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असून, या जागेसाठी भुजबळांचे नाव चर्चेत असले तरी अद्याप अधिकृत घोषणा नाही.

छगन भुजबळ काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष

नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांनाही आवाहन

नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान करण्याचे आवाहनही केले.

नितीन राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांनाही केलं आवाहन

नागपूर

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपला मुलगा कुणाल आणि पत्नीसोबत जाऊन नागपुरातील गुरुनानक महाविद्यालय बेजनबाग येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनीही मतदान करावे, असं आवाहन त्यांनी केलं.

लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हा - सुधीर मुनगंटीवार

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कुटुंबासह मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी सपना, मुलगी शलाका आणि जावई तन्मय बिडवाई सोबत होते. हा लोकशाहीचा उत्सव असून यात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

सिंधुदुर्गात शिवसेनेत नाराजी, किरण सामंत कार्यकर्त्यांची मने वळवतील - उदय सामंत

सिंधुदुर्ग

महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजय होईल. नारायण राणेंसोबत आपली चर्चा झालीय.

राणे आणि सामंत कुटुंब राजकारणात एकत्र असतील आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास राणेंचा विजय निश्चित, उदय सामंत यांना विश्वास

कोणत्याही आश्वासनावर सामंत कुटुंब काम करत नाही.

आमची भूमिका एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहांकडे पोहचवली. त्यामुळे आम्ही कामाला लागलोय.

सिंधुदुर्गमधील शिवसेनेतील नाराजीबाबत किरण सामंत सिंधुदुर्ग दौरा करून कार्यकर्त्यांची मने वळवतील.

मोठ्या मताधिक्याने राणेंचा विजय होईल.

धाराशिवमध्ये महायुतीच्या रॅलीला सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रॅली सुरू

बार्शी नाका परिसरातून महायुतीच्या रॅलीला झाली सुरूवात

मतदान यंत्र १५ मिनिटांसाठी पडले बंद, कर्मचाऱ्यांची तारांबळ

चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अतिशय संवेदनशील असलेल्या परमडोली येथील २७१ बूथ क्रमांकावर मतदान यंत्र बंद पडल्याची घटना समोर आली. यामुळं मतदान कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. वेळीच तंत्र सहाय्यक आल्याने १५ मिनिटांत ते सुरू झाले.

महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांत सकाळी ११ पर्यंत इतकं मतदान!

नागपूर :

विदर्भातील ५ मतदारसंघांसाठी आज मतदान

सकाळी ११ पर्यंत मतदानाची टक्केवारी

भंडारा- गोंदिया - 19.72% मतदान

चंद्रपूर 1- 8.94% मतदान

गडचिरोली- चिमूर - 24.88% मतदान

नागपूर - 17.53% मतदान

रामटेक - 16.14% मतदान

सर्वाधिक मतदान गडचिरोली-चिमूरमध्ये झालंय

गडचिरोलीत सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंतच मतदान होणार. नक्षल प्रभावित भाग असल्याने वेळेची मर्यादा

मतदानानंतर देवेंद्र फडणवीसांनी मतदारांना केलं महत्वाचं आवाहन

व्हीआयपी रोड, नागपूर

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे.

महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया या मतदारसंघांसाठी होतंय मतदान

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांनी नागपूर येथे मतदान केलं.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर फडणवीस यांचे मतदारांना महत्वाचं आवाहन

लोकशाहीच्या या उत्सवात सगळ्यांनी सहभागी होऊन मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

विजय वडेट्टीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांत मतदान होत आहे.

गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी मतदान होत असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यातील २ लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला

अर्धा एप्रिल महिना संपला तरी मार्च महिन्याचा पगार झालेला नाही

सध्या लग्नसराई आणि शिक्षणाचा खर्च असल्याने वेळेत पगार मिळण्याची केली विनंती

मार्च-एप्रिल महिन्याचा पगार विनाविलंब मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे मुख्य सचिवांना पत्र

माढ्यात महायुतीला मोठा धक्का, उत्तम जानकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश

पंढरपूर

माळशिरसचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जानकरांचा पक्षप्रवेश होणार

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक बडे नेतेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश

महाविकास आघडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जानकर देणार पाठिंबा

अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीचे शक्तिप्रदर्शन

धाराशिव

बार्शी नाका परिसरात मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित

थोड्याच वेळात अजित पवार होणार रॅलीमध्ये सहभागी

महायुतीच्या नेत्यांचे फोटो घेऊन कार्यकर्ते झाले सहभागी

अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार धाराशिव दौऱ्यावर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित सभेला अजित पवार करणार संबोधित

माढाचा तिढा सुटला; शरद पवारांच्या भेटीनंतर शेकाप नेते डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड अखेर थंड

पंढरपूर (Pandharpur)

अनिकेत देशमुख यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचे केले होते घोषित

रात्री उशिरा शरद पवार आणि अनिकेत देशमुख यांच्यात भेट

भेटीनंतर अनिकेत देशमुख यांचे बंड थंड झाले

अनिकेत देशमुख हे सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू

काही वेळातच आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे भरणार उमेदवारी अर्ज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत वाकचौरे उमेदवारी अर्ज भरत आहेत. राहाता शहरात महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा आज समारोप

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून 18 एप्रिल पासून निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर एक एप्रिल पासून सुरू झालेली महाविकास आघाडीच्या उमेदवार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रेचा आज अहमदनगर शहरात समारोप होत आहे. या समारोपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरात सायंकाळी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे . अहमदनगर शहरातील ऐतिहासिक अशा गांधी मैदानात ही सभा होणार आहे या सभास्थळा वरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी

ही निष्ठावंताची लढाई- रोहित पवार 

ही निष्ठावंताची लढाई, असं रोहित पवार म्हणाले आहेत. जनता चार जूनला धडा शिकवेल. सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानंतर रोहित पवारांनी ही निष्ठावंताची लढाई असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं विशेष आवाहन

नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी मतदारांना विशेष आवाहन केलं. आपण देशातील सर्वात मोठा सण अत्यंत उत्साहात साजरा करत आहोत. नागपुरात मी विशेषत: मतदारांना आवाहन करेन की इथं तापमान जास्त आहे, त्यामुळे त्यांनी लवकर मतदानासाठी यावं, असं नितीन गडकरी म्हणाले.

गेल्या निवडणुकीत नागपुरात ५४ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे, असंही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्याविरोधात महाविकास आघाडीने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.

विदर्भातील ५ मतदारसंघात आतापर्यंत किती टक्के मतदान? आकडेवारी आली समोर

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वाजेपासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत ७.२८ टक्के मतदान झाले आहे.

लोकसभा मतदारसंघ निहाय मतदान

९- रामटेक ५.८२ %

१०- नागपूर ६.४१%

११- भंडारा-गोंदिया ७.२२ %

१२- गडचिरोली -चिमूर ८.४३%

१३- चंद्रपूर ७.४४%

पूर्व विदर्भात लोकशाहीचा उत्सव; मतदान केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहेत. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या ५ मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदानासाठी पहाटेपासून मतदान केंद्रावर नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मतदान केंद्रावर कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

सोलापुरात महायुतीच्या प्रचारासाठी मनसे लागली कामाला, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे उतरली मैदानात.

राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रेनी सोलापुरात मनसैनिकांना कामाला लागण्याच्या दिल्या सूचना.

सोलापूर आणि माढा लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मनसेने बोलावली बैठक.

भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची मनसेच्या बैठकीला हजेरी.

मनसे आजपासून राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक - निंबाळकरांच्या प्रचारासाठी उतरणार.

दिघोरीत मतदान केंद्रावर मोठी गर्दी; नगरसेवक पिंटू झलके यांनी EVM वर घेतला आक्षेप

विदर्भातील लोकसभेच्या ५ जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत आहे.

सकाळी ७ वाजेपासून मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली आहे.

अशातच जयमाता प्राथामिक शाळा, दिघोरी येथे मतदार केंद्रावर मोठी गर्दी झाली आहे.

७ वाजता सुरु होणारे मतदान तब्बल १ तास १० मिनिट उशीराने सुरु झाले आहे.

त्यातच नगरसेवक पिंटू झलके यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे.

ईव्हीएममध्ये खराबी आल्याने पूर्ण युनिट बद्दलविण्यात आले आहे.

विदर्भातील पाचही जागा भाजप जिंकेल; चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

लोकसभा निवडणुकीतील पहिल्यात टप्प्यातील मतदान आज पार पडत आहेत. यामध्ये विदर्भातील ५ जागांचा समावेश आहे. या सर्वच सर्व जागांवर भाजपचा विजय होईल, असा विश्वास महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

मला बिनविरोध निवडून द्या, शांतीगिरी महाराजांचं राजकीय पक्षांना आवाहन

- नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवणार

- या पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराजांचं सर्व राजकीय पक्षांना आवाहन

- भक्तांनी स्वखर्चाने प्रचार करण्याचं देखील शांतीगिरी महाराजांचं भक्तांना आवाहन

- नाशिक लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी आत्तापर्यंत १७ खासदार निवडून दिले

- त्यामुळे यंदा राजकीय पक्ष आणि मतदारांनी शांतीगिरी महाराजांचा विचार करावा

- बिनविरोध निवडून द्यावे आणि आपली शान राखावी, शांतीगिरी महाराज

- आजपर्यंत सर्व पक्षांनी बाबांचे आशीर्वाद घेतले, यावेळी कृतज्ञता म्हणून बिनविरोध निवडून देवून इतिहास घडवावा

- शांतीगिरी महाराजांच्या प्रचाराची पोस्ट चर्चेचा विषय

- एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असताना शांतीगिरी महाराजांचा प्रचार संदेश होतोय व्हायरल

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर आज मतदान होणार आहे.

२१ राज्यांत १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ पर्यंत मतदान चालणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सकाळीच नागपूरमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बचावला आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ५ जागांसाठी आज मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये आज शुक्रवारी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५ मतदारसंघांचा समावेश आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली- चिमूर व भंडारा- गोंदिया या मतदारसंघांत आज मतदान होईल.

सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी ठिकठिकाणी मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनाद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com