Pune Municipal Corporation: पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात; महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट?

Pune Municipal Corporation: पुणेकरांचे शेकडो कोटी रुपये खड्ड्यांत गेले आहेत...हो तुम्ही ऐकलं ते सत्य आहे....पुण्यातले खड्डे बुजवण्यासाठी २५० कोटी खर्च करण्यात आला. मात्र खड्डे जसेच्या तसेच आहेत. नेमके कुणी या पैशांवर डल्ला मारला? कुणा-कुणाच्या खिशात हे पैसे गेले?
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSaam TV
Published On

Pune Municipal Corporation: पुणेकरांच्या कष्टाचा पैसा ठेकेदारांनी अक्षरश लुटलाय. एक दोन नव्हे तर चक्क २५४ कोटी खर्च करुन ही पुणेकरांच्या नशिबी खड्डेच आलेत. गुळगुळीत रस्ते आणि खड्डेमुक्त पुणेच्या घोषणा देणाऱ्या पुणे महापालिकेनं पुणेकरांच्या विश्वासाचा अक्षरशः लिलाव मांडलाय. गेल्या वर्षभरात केवळ रस्ते खड्डे बुजवण्यासाठी तब्बल २५४ कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली, आणि इतकं करुनही रस्त्यांवर खड्डे पडल्यानं येत्या तीन महिन्यांत आणखी २५० कोटींचा चुराडा करण्याची तयारी महापालिकेनं ठेकेदारांच्या संगनमतानं चालवलीय. रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतच कसा खड्डा खणला पाहा...

इतके पैसे खर्च करुनही पुण्यात रस्त्यांची दुर्दशाच आहे. कोर्टाच्या आदेशाचे कारण दाखवून अत्यावश्यक बाब म्हणून निविदा न काढता ठेकेदारांना कोट्यवधींची खैरात देण्यात आल्याचं दिसतंय. मात्र आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Pune Municipal Corporation
Pune Mumbai Expressway Traffic Update: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; बुधवारी तीन तास कनेक्टिंग लिंक बंद

रस्ते 2 वर्षांच्या आत खराब झाले तर ठेकेदाराकडून फुकट दुरुस्त करुन घेण्याचा नियम असतांनाही ठेकेदारांकडून फुकटात रस्ते दुरुस्त का करुन घेण्यात आले नाही. त्यामुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय.

Pune Municipal Corporation
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं ५६व्या वर्षी निधन; दीर्घ आजाराशी झुंज अपयशी, सावत्र मुलाने लिहिली भावूक पोस्ट

रस्ते बनवण्यापेक्षा खड्डे बुजवण्यावर जास्त खर्च होतो. मात्र तरीही खड्डे तसेच राहतात. कारण पालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभ्रद युतीमुळे पैसे खड्ड्यात नव्हे तर खिशात जातात. त्यामुळेच खड्डे नागरिकांच्या जीवावर उठतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com