

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune Municipal Election Update News : पुण्यासह राज्यातल्या महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली. मात्र पुण्यामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची उमेदवाराची कधी घोषणा कधी होणार? उमेदवारी अर्ज कधी भरणार? याकडे लक्ष लागले आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करतील आणि उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. पण त्याआधी आघाडी, युत्या अन् मैत्रीपूर्ण लढती कुणामध्ये होणार? याची चर्चा सुरू आहे.
सध्याच्या आज तरी पुण्यात कुठला पक्ष कोणासोबत युती हागाडी करून लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये युद्ध आघाड्या होणार का किंवा राजकीय पक्ष एकमेकांसोबत सन्मानपूर्वक जागावाटप करणार का हा प्रश्न मोठा आहे. पुण्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांची ताकद ही पुण्यात जास्त आहे. विधानसभा आणि लोकसभानंतर भाजप पुण्यात महानगरपालिका निवडणूक मोठ्या संख्येने जिंकेल अशी सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळे साहजिकच भाजपकडून महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
राज्यात भाजप शिवसेनेसोबत लढेल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर अजूनही पुण्यात भाजप आणि शिवसेनेची समाधानकारक बैठक जागा वाटपाबाबत झालेली नाही. भाजपने शिवसेनेला फक्त १५ जागा देऊ असे सांगितल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. भाजप १२५ पेक्षा जास्त जागा पुण्यात लढणार असं दिसतंय. त्यामुळे भाजप किती जागा लढणार? शिवसेनेला किती जागा देणार? हे अजून निश्चित व्हायचं आहे.
भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट. ज्याकडे लढण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार यावरच अजून चर्चा सुरू आहेत. त्यानंतर जागावाटप होईल आणि मग निवडणूक कशी लढली जाणार हे ठरवलं जाईल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांचा फॉर्मुला अजून ठरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने 40 ते 45 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट 30 ते 35 जागा देईल, असं चित्र स्पष्ट दिसते. अजित पवार 80 पेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय, पण पुण्यात काँग्रेस शिवसेनेसोबत सध्या तरी लढण्यास इच्छुक आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र लढले जावे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढेल का ? याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे. महाविकास आघाडी जागांचा फॉर्मुला अजून ठरलेला नाही. मुंबईमध्ये शिवसेना उबाठा आणि मनसेची युती झाली आहे. मात्र पुण्यात अजूनही चर्चा सुरू आहे. या चर्चा कधीपर्यंत संपतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेना उबाठा शहरात 41 जागा महाविकास आघाडीकडे मागत असल्याची चर्चा आहे. तर मनसे किती जागा लढणार यावरही अजून निर्णय नाही. त्यामुळे पुणे शहरात सध्यातरी कुठलाही पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. अधिकृत कुठला पक्ष किती जागा लढणार हेही ठरलेलं नाही. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवस बाकी असतानाही राजकीय पक्षांची मात्र उमेदवारांसाठी आणि युती आघाडीसाठी धावपळ अजूनही सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.