husband of newly elected councillor murdered in Khopoli
husband of newly elected councillor murdered in Khopoli Saam TV Marathi

Crime : मोठी बातमी! नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या कारमधून आले अन् वार केले

husband of newly elected councillor murdered in Khopoli : नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. काळ्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी केली हत्या.
Published on

विकास मिरगणे, साम टीव्ही प्रतिनिधी

Khopoli murder case black car attackers : खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठले अन् सपासप वार करत जीव घेतल्याचं समजेतय. चार दिवसांपूर्वीच मानसी काळोखे खोपोवलीमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. पण या आनंदाला नजर लागली. काही अज्ञात व्यक्तींनी मानसी काळोखे यांच्या पतीला रस्त्यात गाठले अन् जीव घेतला. या घटनेनंतर खोपोलीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. काळोखेंची हत्या का केली? या हत्येमागे कोण आहे? याचा तपास खोपोली पोलिसांकडून करण्यात येत आहे. (Raigad political murder latest news)

रविवारी राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतीचा निकाल जाहीर झाला. रायगड, पुणे, सोलापूरसह राज्यभरातील २८८ नगरपरिषदा अन् नगरपंचायतीमध्ये नवं सरकार स्थापन झाले. खोपोलीमध्येही २१ डिसेंबर रोजी नवे सरकार आले. पण खोपोलीकरांवर चार दिवसांतच दुखाचे सावट पसरलेय. नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांचा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर खोपोलीतील वातावरण तणावाचे आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा शोध घेतला जात आहे.

husband of newly elected councillor murdered in Khopoli
Mumbai Local : लोकलमध्ये राडा ! राजेशने घराशेजारी राहणाऱ्या सिराजला गर्दीत गाठले, चाकूने छातीवर-पाठीवर सपासप वार केले

मंगेश काळोखे हे नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. त्यांनी आपल्या मुलांना शाळेत सोडले. ते घराकडे परत येत होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खोपोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांकडून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. आज सकाळी सात वाजता ही घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

husband of newly elected councillor murdered in Khopoli
म्हातारचळ! ७० वर्षांच्या आजोबाने धावत्या बसमध्ये मुलाचं केलं लैंगिक शोषण, व्हिडिओमध्ये हैवानियत कैद

मंगेश काळोखे हे मुलाला शाळेत सोडून घरी परत येत होते. त्यावेळी रस्त्यात त्यांना अडवले अन् जीवघेणा हल्ला केला. प्रत्यक्षदर्शीच्या मते काळ्या रंगाच्या एक गाडीतून काही हल्लेखोर आले होते. मंगेश काळोखे आणि हल्लेखोरांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली. त्यांनी मंगेश काळोखे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. मंगेश काळोखे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. मंगेश काळोखे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावर तात्काळ पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. हत्येचे कारण पोलिसांकडून शोधले जात आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर खोपोलीत तणावाचे वातावरण तयार झालेय.

husband of newly elected councillor murdered in Khopoli
Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com