सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Pune Uday Joshi Passes Away : पुण्यातील भाजपचे दिग्गज नेते उदय जोशी यांचं आज सकाळी निधन झाले. फसवणूक प्रकरणात ते येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत होते. आज सकाळी अचानक त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारावेळी त्यांचं निधन झाले. पुण्यातील सदाशिव पेठेत जोशी यांची ताकद होती. १९९७ मध्ये ते या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नीनीही याच वॉर्डात नगरसेविका राहिल्यात.
उदय जोशी यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्या प्रलंबित अर्जाची आजच सुनावणी होणार होता. पण त्याआधीच त्यांचं निधन झाले. उदय जोशी हे सदाशिव पेठेतून १९९७ ते २००२ दरम्यान भाजपचे नगरसेवक होते. महिला आरक्षणानंतर त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या नगरसेविका होत्या.
माजी नगरसेवक उदय जोशी यांचा मुलगा मयुरेश सर्व काम पाहत होता. नऊ जणांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल झालेल्या चुकीच्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला होता. गुंतवणूकदारांची पाच कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश जोशी यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याबाबत ठेकेदार यांनी फिर्याद दिली होती.
गॅस एजन्सीत रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जोशी विरोधात नऊजणांनी तक्रारी दिल्या होत्या.परंतू हा गुन्हा जोशी कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्यासाठी करण्यात आला होता.कोरोना महामारीच्या काळात जोशी यांचा गॅस एजन्सीचा व्यवसाय आर्थिक व तांत्रिक संकटात सापडला होता.म्हणून जोशी यांनी काही जणांकडून हातउसने पैसे घेतले होते. त्यामध्ये काही सावकारांचा समावेश होता. त्यामुळे काही सावकरांनी गॅस एजन्सी ताब्यात घेण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल केल्याची माहिती जोशी कुटुंबांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.