

Weather Health Risks Latest Health News in Marathi : उत्तर भारतासह देशात सध्या हाडं गोठवणारी थंडी पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने घसरत असल्याने थंडीचा प्रभाव वाढलाय. थोरामोठ्यांसह वृद्ध अन् चिमुकल्यांच्या आरोग्यावर वाढत्या थंडीचा गंभीर परिणाम होत आहे. थंड वारे, घसरणारे तापमान आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आजार बळावत असल्याचे दिसत आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीचा परिणाम हृदय आणि मेंदूवर असल्याचे समोर आलेय. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये थंडीमध्ये हॉर्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य विभागही चिंतेत आहे. हार्ट अटॅक अन् ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झालेल्यांची कानपूरमधील संख्या १०० पेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे.
स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, कानपूरमधील रूग्णालयात गेल्या आठवडाभरात हार्ट अॅटक आणि ब्रेन स्ट्रोकच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत कानपूरमध्ये हार्ट अॅटक अन् ब्रेनस्टोकमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे. या आकड्यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. थंडीच्या काळात स्वत:ची काळजी न घेणं जिवावर येऊ शकते, असा सल्ला तज्ज्ञाकडून दिला जातोय. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यातील कडाक्याची थंडी शरीरावर अतिरिक्त दबाव टाकते. त्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळेच थंडीमध्ये हार्ट अॅटक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरिकांनी थंडीमध्ये स्वत:ची काळजी घ्यावी.
दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेशसह उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमुळे आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेय. कानपूरमध्ये रूग्णालयात रूग्णांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी व्यस्त असल्याची परिस्थिती आहे. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक अशक्तपणा येणे, हातपाय सुन्न होणे, बोलण्यास त्रास होणे यासारख्या रूग्णांच्या तक्रारी आहेत.
हिवाळ्यात हार्ट अटॅक अन् ब्रेन स्ट्रोक का?
कानपूरमध्ये हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीमध्ये हार्ट अटॅक अथवा ब्रेन स्ट्रोक येण्याचे कारण डॉ. टी.एस. क्लेर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, थंड हवामानामुळे शरीराच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला अधिक काम करावे लागते. ज्या व्यक्तीला आधीच उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा हृदयरोग आहे त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
हिवाळ्यात कमी पाणी पितात. जास्त जड आणि तळलेले पदार्थ खातात. या सर्व सवयी रक्त जाड करतात, ज्यामुळे रक्तातील अडथळा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, असेही ते म्हणाले.
उपाय काय ?
सकाळी आणि संध्याकाळी थंडीत बाहेर पडताना उबदार कपडे घाला.
तुमचा रक्तदाब आणि साखर नियमितपणे तपासा.
हलका आणि संतुलित आहार घ्या.
मीठ आणि तळलेले पदार्थ टाळा.
कमी तहान लागली तरी पुरेसे पाणी प्या.
व्यायाम कराच, अथवा नियमित चालणे सुरू ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.