Vivekanad Patil : विवेकानंद पाटील राजकारणात उतरणार? उत्तराने चर्चेला उधाण

Pune MPSC Protest Vivekanad Patil News : पुण्यातील ११ दिवसांच्या MPSC आंदोलनाला स्थगिती मिळाली. विवेकानंद पाटील राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण.
Pune MPSC Protest Vivekanand Patil News
Pune MPSC Protest Vivekanand Patil News Saam tv
Published On: 
Summary
  • पुण्यातील MPSC परीक्षार्थींच्या ११ दिवसांच्या आंदोलनाला स्थगिती

  • विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडल्यामुळे विवेकानंद पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी

  • विवेकानंद पाटील राजकारणात उतरण्याची चर्चा

पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर रविवारी मध्यरात्री आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आक्रमकपणे मांडणारा विवेकानंद पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवणार की राजकारणात प्रवेश करणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

विवेकानंद पाटील राजकारणात प्रवेश करणार?

पुण्यातील आंदोलनात विवेकानंद पाटीलने केलेल्या भाषणांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी त्याने सातत्याने भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह तो आंदोलनात सक्रिय होता. त्यामुळे त्याच्या वक्तृत्वाची आणि नेतृत्वाची चर्चा सोशल मीडियावरही होऊ लागली. आंदोलन स्थगित झाल्यानंतर विवेकानंद पाटीलला त्याच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तु आता MPSC चा अभ्यास करणार की राजकारणात प्रवेश करणार, अशी विचारणा झाली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी २०२९ मध्ये तो आमदार म्हणून निवडून येईल, अशा घोषणा दिल्या. या प्रश्नावर उत्तर देताना विवेकानंद म्हणाला, “कालाय तस्मै नमः. या प्रश्नाचं उत्तर मी सध्या देऊ शकत नाही. येणारा काळच याचं उत्तर देईल.” त्याच्या या विधानामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, त्याने राजकारणात प्रवेश करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Pune MPSC Protest Vivekanand Patil News
Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

आंदोलनातील मागण्यांवर सरकारची भूमिका

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी प्रमुख होती. सरकारने थेट राजीनाम्याऐवजी चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. चौकशी पूर्ण होईपर्यंत भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. समितीला चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून तुकाराम मुंढे यांची समितीच्या सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Pune MPSC Protest Vivekanand Patil News
Monsoon Update : मुसळधार पाऊस झोडपणार! २४ राज्यांना अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा

विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

याशिवाय, आगामी तीन वर्षांत ७० हजार रिक्त पदे भरण्याचे आश्वासन, २०२७ मधील गट-क पदांची संख्या वाढवणे, MPSCच्या परीक्षा ऑफलाइन घेणे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. तसेच तहसीलदार भरतीतील जागांचे प्रमाण बदलणे आणि आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्यासंदर्भातही निर्णय जाहीर करण्यात आले. आंदोलनाला स्थगिती मिळाली असली, तरी विवेकानंद पाटील यांची पुढील दिशा काय असेल, याकडे विद्यार्थ्यांसह अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com