Pune Metro Line 3 : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 'या' तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत; जाणून घ्या A to Z माहिती

Pune Metro Line 3 Hinjwdi Shivajinagar : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक ३ चा पहिला टप्पा १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. माण ते रामनगर बाणेरदरम्यान १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार आहे.
PUNE METRO UPDATE: HINJAWADI-SHIVAJINAGAR METRO PHASE 1 LIKELY TO START FROM JULY 15
PUNE METRO UPDATE: HINJAWADI-SHIVAJINAGAR METRO PHASE 1 LIKELY TO START FROM JULY 15Saam Tv
Published On
Summary
  • हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ चा पहिला टप्पा १५ जुलैपासून सुरू होणार

  • १२ मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार

  • १५ ते २० जूनदरम्यान CMRS कडून तांत्रिक तपासणी होणार

  • दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

अक्षय बडवे, पुणे

पुणेकरांसाठी आनंदवार्ता! हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मेट्रो मार्गिका क्रमांक ३ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १५ जुलै रोजी होण्याची शक्यता असून, यामुळे दररोज हिंजवडीकडे प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात माण ते रामनगर बाणेर दरम्यानची १२ मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. या टप्प्यामुळे हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

PUNE METRO UPDATE: HINJAWADI-SHIVAJINAGAR METRO PHASE 1 LIKELY TO START FROM JULY 15
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणर? तारीख आली समोर

मेट्रो सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी १५ जून ते २० जून या कालावधीत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. सुरक्षा आयुक्तांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. दरम्यान, या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ या कंपनीला ३० जूनपर्यंत सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जूनअखेर कामे पूर्ण झाल्यानंतर पावसाळी परिस्थिती आणि तांत्रिक बाबींचा विचार करून १५ जुलैपासून सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

PUNE METRO UPDATE: HINJAWADI-SHIVAJINAGAR METRO PHASE 1 LIKELY TO START FROM JULY 15
Gold Rate Today : सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचा भाव काय ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाची उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात हाय स्ट्रीट बाणेर ते शिवाजीनगर दरम्यानची ११ स्थानके डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर संपूर्ण मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. तसेच मेट्रोशी संबंधित सुशोभिकरण आणि इतर किरकोळ कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. हिंजवडी आयटी पार्क हे देशातील प्रमुख आयटी केंद्रांपैकी एक मानले जाते. येथे कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर कर्मचारी ये-जा करतात. त्यामुळे मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच वेळची बचत होणार असून, पुणेकरांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com