लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर
पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान जमा होणार
अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
Maharashtra Ladki Bahin Yojana May June Installment Update राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या १२ ते १५ जून दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष मे महिन्याचा हप्ता कधी खात्यात येणार याकडे लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थी महिलांच्या खात्यात मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, १२ ते १५ जून दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाऊ शकते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १० जून रोजी जारी करण्यात आला.
संभाव्य तारीख समोर आल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अनेक महिलांनी यापूर्वी हप्ता जमा होण्यास झालेल्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र आता निधी मंजूर झाल्याने आणि संभाव्य तारखा समोर आल्याने लाभार्थींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नसून त्यांच्या खात्यात मे महिन्याचा कोणताही हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.