Pune Crime : पुण्यात इंदौरी इश्क! प्रसिद्ध तरुणी रिलस्टारने बॉयफ्रेंडचे हात-पाय बांधले, नंतर केलं धक्कादायक कृत्य; शहरात खळबळ

Pune Crime News : कमल आणि संध्या पवारचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. कमल हा गुरूवारी १२ जून रोजी रात्री आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला असता, दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.
murder in Maval Indori village
murder in Maval Indori villageSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध महिला रिल्स स्टारने आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून दोघांमध्ये वाद झाल्यानं ही घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून आरोपी महिलेनं टोकाचं पाऊल उचललं असून मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी संशयित महिला संध्या पवारला ताब्यात घेतलं आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.

संध्या पवार (वय ३०) असं महिला आरोपीचं नाव आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंधातून वाद झाला, अशावेळी तिने आपल्या बॉयफ्रेंडचे हात-पाय बांधले. त्यानंतर क्रिकेटच्या बॅटने अमानुषपणे मारहाण करत त्याची हत्या केली. दरम्यान, ही घटना १२ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हत्येत मृत पावलेल्या तरुणाचं नाव कमल रामदयाल मधुकर (वय ३०, मूळ रा. छत्तीसगड) असं आहे. या प्रकरणी कमलच्या बहिणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संध्या पवारच्या विरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तिला अटक केली आहे.

murder in Maval Indori village
काठी टेकत आले, थरथरत्या हातांनी लेकाच्या अंत्यदर्शनासाठी हात जोडला; कॅ.सुमित सभरवालांच्या पित्याकडून अखेरचा निरोप

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल आणि संध्या पवारचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. कमल हा गुरूवारी १२ जून रोजी रात्री आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला असता, दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या वादामुळे दोघेही संतप्त झाले, अशावेळी संध्याने कमलचे हातपाय बांधले आणि क्रिकेटच्या बॅटने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत कमल गंभीर जखमी झाला. या घटनेनं इंदोरी गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

murder in Maval Indori village
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, IMDची मोठी माहिती! सतर्क राहण्याचं आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com