काठी टेकत आले, थरथरत्या हातांनी लेकाच्या अंत्यदर्शनासाठी हात जोडला; कॅ.सुमित सभरवालांच्या पित्याकडून अखेरचा निरोप

Sumit Sabharwal Father Last Rites : पुष्कराज सभरवाल काठी टेकत टेकत आले अन् थरथरत्या हातांनी आपल्या मुलाला अखेरच्या निरोपसाठी त्यांनी हात जोडला. दिवंगत कॅप्टन सुमित यांना अखेरचा निरोप देताना, त्यांच्या वडिलांकडे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
Sumit Sabharwal Father Last Rites
Sumit Sabharwal Father Last Rites Saam Tv News
Published On

मुंबई : मुंबईतील पवईमधील सोसायटीत आज सकाळीच मोठी गर्दी जमली होती, या गर्दीतून वाट काढत, काठी टेकत टेकत ८८ वर्षीय पुष्कराज सभरवाल पुढे आले आणि आपल्या मृत मुलाचं पार्थिव पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या १७१ विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यासह २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गेल्या ४ दिवसांपासून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना NDN सॅम्पलची चाचणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह सोपविण्यात येत आहे. सुमित सभरवाल यांचे पार्थिव आज त्यांच्या मुंबईतील घरी आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. पुष्कराज सभरवाल काठी टेकत टेकत आले अन् थरथरत्या हातांनी आपल्या मुलाला अखेरच्या अंत्यदर्शनासाठी त्यांनी हात जोडला. दिवंगत कॅप्टन सुमित यांना अखेरचा निरोप देताना, त्यांच्या वडिलांकडे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

एअर इंडियाच्या AI-171 विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांचे ८८ वर्षाचे वृद्ध वडील आपल्या लेकाचे पार्थिव पाहून गहिरवले. काठी टेकत टेकत मुलाच्या पार्थिवावर पोहोचल्यानंतर, पार्थिव शरीरावर ठेवण्यात आलेला लेकाचा रुबाबदार गणवेशातील हसरा फोटो पाहून त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. पुष्कराज यांनी शवपेटीवर अश्रू ढाळतच हातातील काठी बाजूला सरकवत दोन हात जोडून लेकाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Sumit Sabharwal Father Last Rites
Neet Exam Scam: शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी; 90 लाख द्या, NEET मार्क वाढवा, महाराष्ट्रात टोळी|VIDEO

सुमित सभरावाल यांचे पार्थिव आज पवईतील त्यांच्या घरी आणल्यानंतर स्थानिकांसह, नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर, चकाला येथील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार दिलीप लांडे, उद्योगपती निरंजन हिरानंदाणी यांच्यासह सोसायटीतील स्थानिक व नातेवाईकांनी अंत्यसंस्काराला गर्दी केली होती. मात्र, या गर्दीत एक चेहरा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता, तो म्हणजे सुमित यांचे वडील पुष्कराज सभरवाल यांचा. आपल्या लेकाच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार घेताना चेहऱ्यावरील शांत भावही मनातील आक्रोश सांगून जात होते.

Sumit Sabharwal Father Last Rites
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, IMDची मोठी माहिती! सतर्क राहण्याचं आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com